सातारा - जिल्ह्यातील प्रमुख देवस्थानांना आमदार रोहित पवार यांनी बारामती ॲग्रो लिमिटेडच्या माध्यमातून मोफत सॅनिटायझरचे वाटप केले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या वतीने जिल्ह्यातील प्रमुख देवस्थानांना मोफत सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यामध्ये, पुसेगाव येथील सेवागरी देवस्थान ट्रस्ट, श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज संस्थान, वाई तालुक्यातील मांढरदेवी देवस्थान ट्रस्ट, शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव या देवस्थानांना प्रत्येकी १०० लिटर सॅनिटायझर देण्यात आले आहे.
कराड तालुक्यातील पाली येथील खंडोबा देवस्थान, म्हसवड येथील सिद्धनाथ देवस्थान आणि औंध येथील यमाई देवस्थानला प्रत्येकी ५० लिटर सॅनिटायझर मोफत दिले आहे. पवार यांनी बारामती ॲग्रो लिमिटेडच्या माध्यमातून या देवस्थानांना हे सॅनिटायझर मोफत पाठवले आहे.