ETV Bharat / state

Four Women Died : शेतातील कामे आटोपून घरी येताना अपघात; ट्रॅक्टर ट्राॅली कालव्यात कोसळून चार महिलांचा बुडून मृत्यू - Four Women Died

साताऱ्यातील कारंडवाडीत मोठी दुर्घटना घडली आहे. शेतातून घरी परत येताना ट्रॅक्टर ट्राॅली कण्हेर उजव्या कालव्यात कोसळून एकाच गावातील चार महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर पाण्यात बुडालेल्या दोन महिलांना वाचविण्यात यश आले आहे. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.

Satara News
ट्रॅक्टर ट्राॅली कालव्यात कोसळली
author img

By

Published : Jun 24, 2023, 10:32 PM IST

सातारा : साताऱ्यातील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या कारंडवाडी गावातील सात-आठ महिला शेतात गेल्या होत्या. सायंकाळी अचानक पाऊस आल्याने सर्व महिला ट्रॅक्टरमध्ये बसून घरी यायला निघाल्या. कारंडवाडी-देगाव रस्त्यावरील कॅनाॅल शेजारून ट्रॅक्टर येत असताना एका वळणावर अचानक ट्रॅक्टरची ट्राॅली कॅनाॅलमध्ये कोसळली. या दुर्घटनेत चार महिलांचा बुडून मृत्यू झाला. कारंडवाडी गावातील चार महिलांच्या अपघाती मृत्युने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. लिलाबाई शिवाजी साळुंखे (वय ६०), उल्का भरत माने (५५), अरुणा शंकर साळुंखे (५८), सीताबाई निवृत्ती साळुंखे (६५, सर्व रा.कारंडवाडी, ता. सातारा) या महिलांचा कॅनालमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. अन्य दोन महिलांवर उपचार सुरू आहेत.

दोन महिला बचावल्या : या दुर्घटनेत दोन महिलांना ट्रॅक्टर चालक व इतरांनी कसेबसे कॅनाॅलमधून बाहेर काढले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला, परंतु त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच गावातील चार महिला बुडाल्याचे समजताच कारंडवाडीतील नागरिक, महिलांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. चारही महिलांचे मृतदेह कॅनाॅलमधून बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले.

पाण्यात बुडून मृत्यू : याआधीही अशीच एक घटना घडली आहे. पाळीव कुत्र्याला तलावात आंघोळ घालताना बहीण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. ही घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली पूर्व परिसरात असलेल्या दावडी तलावात घडली होती. कीर्ती रविंद्रन आणि रणजित रविंद्रन असे मृत्यू झालेल्यांची नावे होते. या घटनेतून त्यांचा पाळीव कुत्रा बचावला होता. मृतक कीर्ती रविंद्रन व रणजित रविंद्रन हे भाऊ-बहिणी कुटुंबासह डोंबिवली पश्चिम भागात असलेल्या उमेश नगर परिसरात राहत होते. मृतक रणजीत हा 'एमबीबीएस'च्या शेवटच्या वर्षाला होता तर कीर्तीने यंदा बारावीमध्ये प्रवेश घेतला होता.

हेही वाचा -

  1. Brother Sister Drown in Lake: कुत्र्याला तलावात आंघोळ घालायला गेले अन् स्वत:च बुडाले; बहीण-भावाचा मृत्यू
  2. Mainpuri Murder : नवविवाहित जोडप्यासह कुटुंबातील 5 जणांची हत्या, खून केल्यानंतर स्वतःवर गोळी झाडत आरोपीची आत्महत्या
  3. Solapur Accident : चार वाहनांचा विचित्र भीषण अपघात, महिलेचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.