ETV Bharat / state

बॉम्बच्या साह्याने रान डुक्कराची शिकार करणार्‍या चौघांना अटक, एक फरार

author img

By

Published : Mar 31, 2021, 5:37 PM IST

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोर्‍यात रूवले वनक्षेत्राच्या हद्दीत बॉम्बच्या साह्याने रान डुक्कराची शिकार करणार्‍या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर एकजण फरार झाला आहे. दरम्यान शिकार केलेल्या रान डुक्कराचे मांस आणि एक चारचाकी देखील जप्त करण्यात आली आहे.

रान डुक्कराची शिकार करणार्‍या चौघांना अटक

पाटण - तालुक्यातील ढेबेवाडी खोर्‍यात रूवले वनक्षेत्राच्या हद्दीत बॉम्बच्या साह्याने रान डुक्कराची शिकार करणार्‍या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर एकजण फरार झाला आहे. दरम्यान शिकार केलेल्या रान डुक्कराचे मांस आणि एक चारचाकी देखील जप्त करण्यात आली आहे.

आरोपींविरोधात गुन्हा दाखल

पाटण तालुक्यातील सणबूर-रूवले मार्गावर रात्र गस्तीवेळी पाटीलवाडी गावच्या हद्दीत वाहनांची तपासणी सुरू होती. यावेळी एम. एच. 09 डी. ए. 1373 क्रमांकाच्या कारच्या डिकीमध्ये रान डुक्कराचे मांस आढळून आले. मांस आढळल्याने वनाधिकाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, ही कार नवेपारगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथील राजाराम गंगाराम गिजे यांच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. तसेच कारमधील दुसरा संशयीत गणेश सोमा परबते याने रूवले (ता. पाटण) गावच्या हद्दीत मातीच्या बंधार्‍याजवळ बॉम्बच्या साह्याने रान डुक्कराची शिकार केली असल्याची कबूली दिली आहे. या प्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले असून, एक जण फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींविरोधात वन्यजीव अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - आता वाघिणच नाही राहिली तर जंगल राखून करायचं काय! वनक्षेत्रपाल दीपालीच्या आईची खंत

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.