ETV Bharat / state

साताऱ्याच्या कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमधून 4 कोरोनामुक्त युवकांना डिस्चार्ज

म्हासोली येथील 32 आणि 33 वर्षीय पुरुष, नांदगाव, शामगाव येथील 22 वर्षीय युवक कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये उपचार घेत होते. त्यांचे उपचारानंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.

साताऱ्याच्या कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमधून 4 कोरोनामुक्त युवकांना डिस्चार्ज
साताऱ्याच्या कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमधून 4 कोरोनामुक्त युवकांना डिस्चार्ज
author img

By

Published : May 30, 2020, 8:59 PM IST

सातारा - कराड तालुक्यातील म्हासोली, नांदगाव आणि शामगाव येथील एकूण 4 कोरोनामुक्त युवकांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 81 कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

साताऱ्याच्या कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमधून 4 कोरोनामुक्त युवकांना डिस्चार्ज

म्हासोली येथील 32 आणि 33 वर्षीय पुरुष, नांदगाव, शामगाव येथील 22 वर्षीय युवक कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये उपचार घेत होते. त्यांचे उपचारानंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक आर. एल. डांगे, अशोक भापकर यांच्याहस्ते कोरोनामुक्त युवकांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, प्राचार्य डॉ. जी. वरदराजुलू, डॉ. संजय पाटील, डॉ. रोहिणी बाबर, राजेंद्र संदे, डॉ. एस. आर. पाटील, हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.