ETV Bharat / state

राष्ट्रवादी संपवण्याच्या नादात पृथ्वीराज चव्हाणांनी काँग्रेस संपवली; उंडाळकरांचे टीकास्त्र - दक्षिण कराड मतदारसंघ

काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रावर लादले. तरीही आम्ही पक्षाचा निर्णय म्हणून त्यांचे स्वागत केले. मात्र, हे महाशय आले आणि फाईलीच चाळत बसले, अशी टीका माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकर यांनी केली आहे. तसेच फाईली चाळताना राष्ट्रवादी संपवायच्या नादात त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस संपवल्याचे त्यांनी म्हटले आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फाईली चाळताना राष्ट्रवादी संपवायच्या नादात महाराष्ट्रातील काँग्रेस संपवल्याची टीका विलासकाका उंडाळकर यांनी केली आहे.
author img

By

Published : Oct 14, 2019, 10:02 PM IST

सातारा - काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रावर लादले. तरीही आम्ही पक्षाचा निर्णय म्हणून त्यांचे स्वागत केले. मात्र, हे महाशय आले आणि फाईलीच चाळत बसले, अशी टीका माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकर यांनी केली आहे. तसेच फाईली चाळताना राष्ट्रवादी संपवायच्या नादात त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस संपवल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कराड दक्षिणमधील रयत संघटनेचे अपक्ष उमेदवार अ‍ॅड.उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या मलकापूर येथील प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी, पृथ्वीराज बाबाला आपले जन्मगाव असलेल्या कुंभारगावची चाळकेवाडीही माहित नाहीत. तसेच दुसरा बाबा पोरकट असून, वाकुर्डे बुद्रुक योजनेचे श्रेय घेताना दुसर्‍याचं पोरगं मांडीवर घेऊन ते माझंच असल्याचे सांगत आहे. अशा शब्दांत भाजप उमेदवार अतुल भोसले यांची विलासकाका उंडाळकार यांनी खिल्ली उडवली.

महाराष्ट्रातील आताचे भाजप सरकार ही पृथ्वीराज चव्हाणांच्याच नाकर्तेपणाची देण असल्याचा टोला उंडाळकर यांनी लगावला. त्यांनी ज्यांना जवळ घेतले, ते खुज्या उंचीचे आणि खुज्या विचारांचे सर्वजण पळाले. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केलेला माणूस खासदारकीचे तिकीट मिळाल्यावर दोन महिन्यातच भाजपकडे पळाला अशी टीका त्यांनी केली. यामुळेच विरोधकांना आज प्रचारासाठी रस्त्याने पळायची वेळ आली आहे. परंतु, मॉर्निंग वॉक करून आणि पिंगळे प्रचाराला आणून जनता भुलणार नाही, असेही उंडाळकर म्हणाले.

अ‍ॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पक्षनिष्ठा, तत्व आणि विचारसरणी असती; तर विधानसभेलाच त्यांनी उमेदवारीचा योग्य निर्णय घेतला असता. तसे झाले असते, तर आज रस्त्याने प्रचार करत पळायची वेळ त्यांच्यावर आली नसती.

आम्ही होतो म्हणून मलकापूर नगरपालिकेत विजय मिळवता आला. मलकापूरच्या निवडणुकीत आम्ही राष्ट्रीय विचारसरणीला साथ दिल्याचे अ‍ॅड. उदयसिंह पाटील म्हणाले.
यावेळी कराड पंचायत समितीच्या सभापती फरीदा इनामदार, रमेश जगदाळे, अधिकराव शिंदे, नगरसेविका कमल कुराडे, नगरसेवक किशोर येडगे, माजी नगराध्यक्ष सागर जाधव, अमर इंगवले, हनीफ मुल्ला उपस्थित होते.

Intro:काँग्रेस पक्षाने पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रावर लादले. तरीही आम्ही पक्षाचा निर्णय म्हणून त्यांचे स्वागत केले. मात्र, हे महाशय आले आणि फाईलीच चाळत बसले. फाईली चाळताना राष्ट्रवादी संपवायच्या नादात त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस संपविली, अशी घणाघाती टीका माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकर यांनी केली.  Body:कराड (सातारा) : काँग्रेस पक्षाने पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रावर लादले. तरीही आम्ही पक्षाचा निर्णय म्हणून त्यांचे स्वागत केले. मात्र, हे महाशय आले आणि फाईलीच चाळत बसले. फाईली चाळताना राष्ट्रवादी संपवायच्या नादात त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस संपविली, अशी घणाघाती टीका माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकर यांनी केली.  
    कराड दक्षिणमधील रयत संघटनेचे अपक्ष उमेदवार अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या मलकापूर (ता. कराड) येथील प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी कराड पंचायत समितीच्या सभापती फरीदा इनामदार, रमेश जगदाळे, अधिकराव शिंदे, नगरसेविका कमल कुराडे, नगरसेवक किशोर येडगे, माजी नगराध्यक्ष सागर जाधव, अमर इंगवले, हनीफ मुल्ला उपस्थित होते. 
     महाराष्ट्रातील आताचे भाजप सरकार ही पृथ्वीराज चव्हाणांच्याच नाकर्तेपणाची देण असून आज नुसतं राफेल राफेल करून काय उपयोग, असा टोला उंडाळकरांनी मारला. सातारा जिल्ह्यात त्यांनी ज्यांना जवळ घेतले ते खुज्या उंचीचे आणि खुज्या विचारांचे सर्वजण पळाले. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केलेला माणूस खासदारकीचे तिकीट मिळाल्यावर दोन महिन्यातच भाजपकडे पळाला. म्हणून त्यांना आज प्रचारासाठी रस्त्याने पळायची वेळ आली आहे. परंतु, मॉर्निंग वॉक करून आणि पिंगळे प्रचाराला आणून जनता भुलणार नाही, असेही उंडाळकर म्हणाले. 
    अ‍ॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पक्षनिष्ठा, तत्व आणि विचारसरणी असती, तर विधानसभेलाच उमेदवारीचा त्यांनी योग्य निर्णय घेतला असता. तसे झाले असते, तर आज रस्त्याने प्रचार करत पळायची वेळ त्यांच्यावर आली नसती. आम्ही होतो म्हणून मलकापूर नगरपालिकेत विजय मिळवता आला. मलकापूरच्या निवडणुकीत आम्ही राष्ट्रीय विचारसरणीला साथ दिली होती. रयत संघटना ज्याच्याबरोबर राहते त्याचा विजय नक्की असतो. मलकापूरवासियांनी आता आम्हाला निवडणुकीत साथ द्यावी. रयत संघटनेने आर्थिक दहशतवाद, सरंजामदारांविरोधात नेहमीच लढाई केली. आम्ही कोणाचीही नुकसान केले नाही. उलट प्रत्येकाला मदतच करत आलो आहोत, असे ते म्हणाले. Conclusion:
 माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबाला आपले जन्मगाव असलेल्या कुंभारगावची चाळकेवाडीही माहित नाही आणि दुसरा बाबा पोरकट असून वाकुर्डे बुद्रुक योजनेचे श्रेय घेताना दुसर्‍याचं पोरगं मांडीवर घेऊन ते माझंच आहे, असे तो सांगत आहे, अशा शब्दांत भाजप उमेदवार अतुल भोसले यांची विलासकाका उंडाळकारंनी खिल्ली
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.