ETV Bharat / state

पाण्याअभावी चारा छावणी बंद, माणदेशी फाउंडेशनचा निर्णय - माण तालुका

छावणीतील जनावरांना दररोज ५ लाख लिटर पाणी मिळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे माणदेशी फाउंडेशनने ही चारा छावणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

चारा छावणी
author img

By

Published : Apr 28, 2019, 6:25 PM IST

Updated : Apr 28, 2019, 11:55 PM IST

सातारा - माण तालुक्यात माणदेशी फाउंडेशनतर्फे चारा छावणी सुरू करण्यात आली होती. मात्र, तालुक्यात सर्वत्र दुष्काळ असल्यामुळे साडेनऊ हजार जनावरांना रोज ५ लाख लिटर पाणी मिळणे अशक्य झाल्याने ही छावणी बंद करण्यात आली आहे.

चारा छावणी

तालुक्यात सर्वत्र दुष्काळ असताना छावणीतील जनावरांना दररोज ५ लाख लिटर पाणी मिळणे अशक्य झाले आहे. तसेच म्हसवड भागात शोधूनही पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक प्रयत्नातून आजपर्यंत चालवली गेलेली ही चारा छावणी बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला, अशी माहिती फाउंडेशनचे सदस्य विजय सिंन्हा यांनी दिली. छावणी बंद करण्यापूर्वी छावणीत जनावरांसोबत मुक्कामी असलेल्या ६४ गावातील सुमारे ४ हजार शेतकरी कुटुंबाची शुक्रवारी सायंकाळी तातडीची बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला, असे त्यांनी सांगितले.

पाणी आणि चाराटंचाईने त्रासलेले शेतकरी यात्रा आणि बाजारामध्ये दुबती आणि खिलार जातीची जनावरे मिळेल त्या किंमतीत विकत होते. हे सरकार जनावरांच्या छावण्या सुरू करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, सरकारकडून दिरंगाई होऊ लागताच चेतना सिन्हा यांनी शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून १ जानेवारीपासून जनावरांची छावणी सुरू केली. यामुळे पशुधन विक्रीचे संकट रोखले गेले. मुंबई येथील बृहत भारतीय समाज आणि बजाज कंपनीने आर्थिक मदतीचा हात पुढे केला, यामुळे ही छावणी चालवणे शक्य झाले. मात्र, सध्या उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. यामुळे विहिरी आटल्या आहेत. परिणामी छावणीतील जनावरांना गेल्या २ दिवसापासून पुरेसे पाणी उपलब्ध करण्यास आम्ही असमर्थ ठरलो आहोत. पाणीच उपलब्ध नसल्यामुळे जनावरांचे हाल होऊ नयेत, यासाठी छावणी बंद करणे हाच एकमेव मार्ग स्वीकारावा लागला, अशी माहिती त्यांनी दिली.

शासकीय अनुदानातून छावणी सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची पूर्तता करणे किचकट आहे. तसेच पूर्तता एवढे करुनही प्रस्ताव दिला तरीही त्यास मंजुरी मिळण्याची खात्री नाही. जर मंजुरी मिळाली तर पाणीटंचाईची समस्या सुटेल, असे वाटत नाही, असे मत व्यक्त करुन विजय सिन्हा यांनी शेतकऱ्यांनी आपली जनावरे चारा आणि पेंड घेऊन आपापल्या गावी जावे किंवा गावानजीकच्या शासकीय चारा छावणीत दाखल व्हावे, असे आवाहन केले आहे.

Intro:सातारा माणदेशी फाउंडेशनचा निर्णय; दररोज पाच लाख लिटर पाणी मिळणे अशक्य. तब्बल साडेनऊ हजार जनावरांना दररोज पाच लाख लिटर पाण्याची गरज असताना. म्हसवड भागात शोधून ही पाणी उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे अनेक प्रयत्नातून आजपर्यंत चालवली गेलेली माणदेशी फाउंडेशन संचालित जनावरांच्या चारा छावणी बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती विजय सिंन्हा यांनी दिली आहे.

Body:सिंन्हा यांनी दिलेल्या माहिती नुसार माणदेश फाऊंडेशन संचलित जनावरांच्या चारा छावणीत जनावरा सोबत मुक्कामी असलेल्या 64 गावातील सुमारे चार हजार शेतकरी कुटुंबाची शुक्रवारी सायंकाळी तातडीची बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. दुष्काळाचे संकट ओढवले आहे. पाणी व चाराटंचाई ने त्रासलेले शेतकरी यात्रा आणि बाजार मध्ये दुबत्ती व खिलार जातीची ही जनावरे मिळेल त्या किंमतीत विकत आहेत. हे सरकार जनावरांच्या छावण्या सुरू करेल अशी अपेक्षा होती परंतु सरकारकडून दिरंगाई होऊ लागताच श्रीमती चेतना सिन्हा यांनी शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमाने एक जानेवारीपासून जनावरांची छावणी सुरू करून पशुधन विक्रीचे संकट रोखण्याचा प्रयत्न केला. मुंबई येथील बृहत भारतीय समाज व बजाज कंपनीने आर्थिक मदतीचा हात पुढे केला, यामुळे ही छावणी चालविणे शक्य झाले. सध्या उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. यामुळे विहिरी आटल्या आहेत. परिणामी छावणीतील जनावरांना गेल्या दोन दिवसापासून पुरेसे पाणी उपलब्ध करण्यास आम्ही असमर्थ ठरलो आहोत. पाणीच उपलब्ध नसल्यामुळे जनावरांचे हाल होऊ नयेत, यासाठी छावणी बंद करणे हाच एकमेव मार्ग स्वीकारावा लागल्याने सांगणे देखील खेदजनक आहे. शासकीय अनुदानातून छावणी सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली कागदोपत्री पूर्तता किचकट असून जरी प्रस्ताव दिला तरी त्यास मंजुरी मिळण्याची खात्री नाही आणि मिळाली तर पाणीटंचाईची समस्या सुटेल अशक्य असल्याचे मत व्यक्त करुन श्री सिन्हा यांनी शेतकऱ्यांनी आपली जनावरे चारा व पेंड घेऊन आपल्या आपल्या गावी जावे किंवा गावानजीकच्या शासकीय चारा छावणीत दाखल व्हावे असे आवाहन केले आहे.

Conclusion:
Last Updated : Apr 28, 2019, 11:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.