ETV Bharat / state

पाऊस थांबला मात्र कोयना परिसरात महापुराची स्थिती अद्यापही कायम

कोयना धरण परिसरात बुधवारच्या तुलनेत गुरूवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. यामुळे धरणाचे सहा वक्री दरवाजे दहा फूटावरून आठ फूटावर करण्यात आले.

कोयना परिसरात महापूराची स्थिती अद्यापही कायम आहे
author img

By

Published : Sep 5, 2019, 9:31 PM IST

सातारा - कोयना धरण परिसरात बुधवारच्या तुलनेत गुरूवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. यामुळे धरणाचे सहा वक्री दरवाजे दहा फूटावरून आठ फूटावर करण्यात आले.

कोयना परिसरात महापूराची स्थिती अद्यापही कायम आहे

धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. धरणाच्या पाणीसाठ्यातही अपेक्षित घट झाल्याने कोयना नदीपात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग काही प्रमाणात कमी केला आहे. सध्या धरणातून 68,304 आणि वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2100 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

हेही वाचा - कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील मैदानात; सतेज पाटलांनी केली घोषणा

याचवेळी धरणात प्रतिसेकंद सरासरी पन्नास ते साठ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. दरम्यान, पूर्वेकडील विभागात महापूराची स्थिती अद्यापही कायम आहे. धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे कोयना नदीवरील नेरळे, मूळगाव, निसरे येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या गावांचा संपर्क तुटला आहे.
धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या अनेक गावातील खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व महापूराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याची माहिती तहसीलदार रामहरी भोसले यांनी दिली.

Intro:सातारा कोयना धरणांतर्गत विभागात बुधवारच्या तुलनेत गुरूवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला. यामुळे धरणाचे सहा वक्री दरवाजे दहा फूटावरून आठ फूटावर करण्यात आले. धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे याशिवाय  पाणीसाठ्यातही अपेक्षित घट झाल्याने हे दरवाजे गुरूवारी कमी करून पुर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग काही प्रमाणात कमी केला आहे. सध्या या दरवाजातून विनावापर 68304 व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2100 असे एकूण 70404 क्युसेक्स पाणी प्रतिसेकंद कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्याचवेळी येथे प्रतिसेकंद सरासरी पन्नास ते साठ हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. दरम्यान पूर्वेकडील विभागात महापूराची स्थिती अद्यापही कायम आहे. धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे कोयना नदीवरील नेरळे, मूळगाव, निसरे येथील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावे अद्यापही संपर्कहीनच आहेत.Body:धरणातून सोडण्यात आलेल्या महाकाय पाण्यामुळे नदीकाठच्या अनेक गावात, लोकवस्त्यात व शेतात पाणी घुसल्याने यात खाजगी व सार्वजनिक मालमत्तांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. कोयना नदीवरील अनेक महत्वपूर्ण पूल पाण्याखाली गेल्याने अंतर्गत गावांचे दळणवळण विस्कळीत झाले आहे. दरम्यान अतिवृष्टी व महापूराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना तयार ठेवण्यात आल्याची माहिती तहसीलदार रामहरी भोसले यांनी दिली. 

       अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला त्यानुसार हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानूसार गेल्या आठ्ठेचाळीस तासांत कोयना धरणांतर्गत विभागात मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाला. सध्या याचा जोर काही प्रमाणात कमी व्हायला लागला आहे .धरणाची 105 टि. एम. सि. पाणीसाठवण क्षमता संपुष्टात आल्यानंतर ज्या पटीत पाण्याची आवक होईल त्याच पटीत ते पाणी पुर्वेकडे सोडण्यात येत होते. या दरम्यान येथील पाण्याची आवक प्रतिसेकंद तब्बल एक लाखांपेक्षाही अधिक क्युसेक्स पर्यंत गेली होती. त्यामुळे या परिस्थितीत धरणाचे दरवाजे दहा फुटांनी वर उचलून त्यातून अधिकाधिक पाणी पुर्वेकडे सोडण्यात येत होते. या महाकाय सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पुर्वेकडे कोयना ते कराड दरम्यान नदीकाठच्या अनेक गावात, लोकवस्त्यात व आजूबाजूच्या परिसरात हे व स्थानिक नद्या, ओढ्यांचे पाणी फुगीवाटे घुसल्याने संबंधितांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर एक महिन्यापुर्वी अशाच अतिवृष्टी व महापूरामुळे अनेकांचे संसार, बाजारपेठातील व्यापारी, उद्योजक आणि शेतकरी यांचे अभूतपूर्व नुकसान झाले होते त्यातूनच कुठेतरी ही मंडळी सावरत असताना यापैकी अनेकांना पुन्हा या महापूराचा फटका बसला आहे. सुदैवाने यावेळी पुर्वेकडील विभागात पावसाचा जोर कमी होता त्यामुळे फुगीवाटे नदीकाठच्या गावात होणारी मोठ्या प्रमाणावरची हानी काही प्रमाणात कमी झाली.

       या महापूराचा फटका पाटण शहरातील मार्केट यार्ड, नवीन स्टँड, जूना स्टँड परिसरातील लोकवस्त्या व काही व्यावसायिकांनाही बसला आहे. याशिवाय संगमनगर  (धक्का ) , नावडी, हेळवाक, मंद्रुळ हवेली आदी ठिकाणीही यामुळे नुकसान झाले. आता पावसाचा जोर कमी झाला असून धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही त्याच पटीत कमी होत आहे. त्यामुळे हळूहळू धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी केले जाणार आहे. याशिवाय सध्या यापेक्षा अधिक प्रमाणात पाणी सोडण्याच्या शक्यता नाहीत परंतु पाणी कमी करण्याच्या शक्यता अधिक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या धरणात एकूण 103.62 टि. एम. सि. पाणीसाठा झाला असून त्यापैकी उपयुक्त साठा 98.62 टि. एम. सि. पाणीसाठा झाला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.