ETV Bharat / state

कराडमध्ये फर्निचर दुकानाला भीषण आग, लाखोंचे नुकसान

author img

By

Published : Apr 30, 2021, 6:52 AM IST

दुकानाच्या पाठीमागील भागाला लागलेली आग पसरत पुढे आली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीची भीषणता खूप होती

कराडमध्ये फर्निचर दुकानाला भीषण आग
कराडमध्ये फर्निचर दुकानाला भीषण आग

कराड (सातारा) - पुणे-बंगळुरू महामार्गालगतच्या मलकापूर (ता. कराड) येथील लोटस फर्निचर दुकानाला गुरूवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत दुकानातील फर्निचर जळून खाक झाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

धुराचे लोट उसळत होते. त्यामुळे महामार्गावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. मदत कार्यात अडथळा येत असल्याने गर्दीवर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

दुकानाच्या पाठीमागील भागाला लागलेली आग

पुणे-बंगळुरू महामार्गालगत मलकापूर-नांदलापूर गावांच्या दरम्यान लोटस फर्निचरचे मोठे दुकान आहे. गुरुवारी दुपारी या दुकानाला भीषण आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. धुराचे लोट उसळू लागले. दुकानाच्या पाठीमागील भागाला लागलेली आग पसरत पुढे आली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीची भीषणता खूप होती. काही वेळाने अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

नागरिकांवर लाठीमार-

आगीच्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांसह महामार्गावरून ये-जा करणार्‍यांनी या ठिकाणी मोठ्याप्रमाणात गर्दी केली. गर्दीमुळे मदत कार्यात अडथळे येत होते. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार करून गर्दी पांगविली. दरम्यान, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. दुकानातील फर्निचर जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.