ETV Bharat / state

महाबळेश्वरजवळील पसरणी घाटात बस उलटली, सुदैवाने जीवित हानी नाही - महाबळेश्वर अपघात बातमी

हाबळेश्वर रस्त्यावर पसरणी घाटात चालकाचा ताबा सुटल्यामुळे तीव्र वळणावर खासगी बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस उलटली. यात 15 जण जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त बस
अपघातग्रस्त बस
author img

By

Published : Dec 31, 2020, 8:44 PM IST

सातारा - महाबळेश्वर रस्त्यावर पसरणी घाटात चालकाचा ताबा सुटल्यामुळे तीव्र वळणावर बस उलटून 15 प्रवासी जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

चाकण येथील सुप्रजित इंजिनिअरिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांची वार्षिक सहल प्रतापगड-महाबळेश्वरला खासगी बसने आली होती. बसमध्ये 34 प्रवासी होते. गुरुवारी (दि. 31 डिसें.) सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास परतीच्या प्रवासाला असताना घाटात बुवासाहेब मंदिराजवळ अवघड वळणावर वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ताबा सुटला. खासगी बस क्रमांक (एम एच 14 सी डब्लू 4764) रस्त्यावरच उलटली. चालकाने प्रसंगावधान राखत बस डोंगराच्या बाजूला नेली. अन्यथा बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना व जीवित हानी घडली असती.

जखमींवर वाई व पाचगणीतील रुग्णालयात उपचार

या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत.अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना वाई व पाचगणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वाई व पाचगणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

काहीकाळ वाहतूक कोंडी

घाटात व डोंगराच्या बाजूला बस उलटल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. काही वेळानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.

हेही वाचा - जीमला निघालेल्या तरुणाला अज्ञात वाहनाने उडवले

हेही वाचा - नववर्ष : गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाबळेश्वरात पर्यटकांची गर्दी कमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.