ETV Bharat / state

Died In Phaltan : फलटणमध्ये ओढ्याच्या पुरात कार बुडून बाप लेकीचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या दमदार पावसामुळे फलटण ( Phaltan ) येथील सोमंथळी गावाच्या ओढ्याला आलेल्या पुरात इर्टिका कार बुडाल्याने कारमधील बाप लेकीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ( Father and daughter died in Phaltan )

Father And Daughter Died In Phaltan
ओढ्याच्या पुरात कार बुडून बाप लेकीचा मृत्यू
author img

By

Published : Oct 18, 2022, 12:03 PM IST

Updated : Oct 18, 2022, 1:56 PM IST

सातारा - जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या दमदार पावसामुळे फलटण ( Phaltan ) येथील सोमंथळी गावाच्या ओढ्याला आलेल्या पुरात इर्टिका कार बुडाल्याने कारमधील बाप लेकीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ओढ्याच्या पुरात अडकलेली कार आज सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढली. मात्र, कारमधील छगन मदने आणि त्यांची १३ वर्षांची मुलगी प्रांजल मदने (रा. वारूगड, ता. माण) या बाप लेकीचा मृत्यू झाला होता. ( Father and daughter died in Phaltan )

फलटणमध्ये ओढ्याच्या पुरात कार बुडून बाप लेकीचा मृत्यू

पावसामुळे घरांची पडझड : फलटण शहर व तालुक्यात सोमवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरात कार बुडाल्याने छगन मदने आणि प्रांजल मदने या बाप लेकीचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. फलटण तालुक्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे.

बाणगंगा नदीला पूर, घरात पाणी शिरले : मुसळधार पावसामुळे फलटणमधील बाणगंगा नदीला मोठा पूर आला. त्यामुळे नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरीकांना रात्रीच सुरक्षितस्थळी हलवावे लागले. फलटण शहरातील शुक्रवार पेठ, शनी नगर, मंगळवार पेठ, मेटकरी गल्ली, शिवाजीनगर, पाच बत्ती चौक या भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. यामुळे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.

लोणंद शिरवळ मार्ग रात्रभर बंद : खंडाळा तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार उडाला. अनेक गावांतील रस्ते पाण्याखाली गेले. लोणंदच्या खेमावती नदीला पूर आला. तसेच लोणंद शिरवळ हा प्रमुख मार्ग रात्रभर बंद होता. पावसामुळे लोणंदला दोन घरांची पडझड झाली असून कोपर्डे येथे दोन मोटारसायकली वाहून गेल्या. खेड बुद्रुकमधील स्मशानभूमीचे शेड देखील वाहून गेले आहे. एका वस्तीतही पाणी शिरले. लोणंद शिरवळ रस्त्यावरील पुलावरूनही पाणी गेल्याने रात्री अकरापासून वाहतुक ठप्प झाली होती. यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. मोर्वे लोणंद आणि मोर्वे शिवाजीनगर हे पूल पाण्याखाली गेल्याने दोन्ही रस्त्यावरील वाहतूक बंद होती.

Last Updated : Oct 18, 2022, 1:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.