ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत' विशेष - परिवहन महामंडळाचे चालक बनले आरोग्यदूत, रुग्णांसाठी करत आहेत ऑक्सिजनची वाहतूक - सातारा जिल्हा लेटेस्ट न्यूज

प्रवाशांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी कोरोना काळात आरोग्यदूत बनून रुग्णसेवा करत आहेत. रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजनच्या टँकरवर चालक म्हणून ते सेवा बजावत आहेत.

परिवहन महामंडळाचे चालक बनले आरोग्यदूत
परिवहन महामंडळाचे चालक बनले आरोग्यदूत
author img

By

Published : May 2, 2021, 8:14 PM IST

सातारा - प्रवाशांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी कोरोना काळात आरोग्यदूत बनून रुग्णसेवा करत आहेत. रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजनच्या टँकरवर चालक म्हणून ते सेवा बजावत आहेत.

खासगी टँकरवर एसटीचे चालक

कोविडचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने 144 कलम लागू केले आणि अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांचे चलनवलन ठप्प झाले. याचा सर्वाधिक फटका राज्य मार्ग परिवहन महामंडळाला म्हणजेच आपल्या एसटीला बसला आहे. दुसरीकडे पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्याने सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होऊ नये, यासाठी प्रशासन मिळेल तिथून ऑक्सिजन उपलब्ध करत आहे. या ऑक्सिजनची वाहतूक टँकरच्या माध्यमातून करण्यात येत असून, त्यासाठी खासगी कंपनीच्या टँकरवर एसटी चालक सेवा बजावत आहेत.

पाच कुशल चालक बजावत आहेत सेवा

लांबचा पल्ला आणि कमी वेळत रुग्णांना ऑक्सिजन मिळाला पाहिजे, यासाठी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या खासगी पुरवठादाराचे टँकर चालवण्याचे काम बसचालक करत आहेत. महामंडळाच्या सातारा आगारातील सुरेश जगताप, एस. एस. निंबाळकर, आर. जी. कदम, के.डी. वाघ, हेमंत काकडे हे चालक जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार या नव्या ड्युटीवर रुजू झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने सातारा आगाराकडे कुशल चालक मागितले होते. त्यानुसार या पाच विशेष कौशल्य प्राप्त चालकांच्या ड्युट्या अतिअत्यावश्यक सेवेसाठी अर्थात ऑक्सिजन वाहतुकीसाठी लावण्यात आल्या आहेत. मुंबई, चाकन, बेल्लोरी (कर्नाटक) या ठिकाणाहून हे चालक बारा ते अठरा टनाचा टँकर घेऊन ऑक्सिजनचा पुरवठा करत आहेत. खासगी चालकाच्या साथीने हे चालक अविरत सेवा देऊन, ऑक्सिजन वेळेत हॉस्पिटलला पोहोचवण्याचे काम करत आहेत.

परिवहन महामंडळाचे चालक बनले आरोग्यदूत

'रुग्णांची सेवा करण्याची संधी'

गेल्यावर्षी कोरोनाच्या प्रारंभी साताऱ्यातून 27 प्रवाशांना घेऊन महामंडळाची लालपरी बस बांगलादेशाच्या सीमावर्ती गावात जाऊन आली होती. काही हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी अवघ्या पाच दिवसांत केला होता. ही बस तिथपर्यंत सुखरूप पोहोचवण्याचे काम चालक सुरेश जगताप व एस. एस. निंबाळकर यांनी केले होते. सुरक्षीत व लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या बांधवांनी दाखवलेले कौशल्य लक्षात घेऊन, त्यांची या अत्यावश्यक सेवेसाठी निवड करण्यात आली आहे. 'आमचे कौशल्य म्हणा किंवा आम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी ही नेमणूक आहे असं समजून आम्ही टँकरवर सेवा देत आहोत. हीच रुग्णसेवा आम्ही समजतो' अशी प्रतिक्रिया एसटीचे चालक सुरेश जगताप यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा - 'पुद्दुचेरी आणि तामिळनाडू वगळता कुठेही सत्तापरिवर्तन होणार नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.