ETV Bharat / state

किन्हईमध्ये महावितरणच्या अभियंत्याने कार्यालयातच घेतला गळफास - सातारा न्यूज

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या किन्हई शाखा (ता. कोरेगाव) कार्यालयातील कनिष्ठ अभियंता सुरज सुधीर देसाई (वय. २६) यांनी स्वत:च्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली.

engineer commits suicide in MSEDCL office at Satara
किन्हईमध्ये महावितरणच्या अभियंत्याने कार्यालयातच घेतला गळफास
author img

By

Published : Dec 13, 2020, 9:12 PM IST

सातारा - महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या किन्हई शाखा (ता. कोरेगाव) कार्यालयातील कनिष्ठ अभियंता सुरज सुधीर देसाई (वय. २६) यांनी स्वत:च्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

रात्री उशिरापर्यंत मोबाईल बंद
शनिवारी रात्री त्यांने हा प्रकार केला असावा. रात्री उशिरापर्यंत त्यांचा मोबाईल बंद होता. कोरेगावात एकत्रित राहत असलेले त्यांचे रुम पार्टनर्स त्यांच्याशी संपर्क करत होते. मात्र संपर्क होऊ शकत नव्हता. आज (रविवारी) सकाळी किन्हईतील शाखा कार्यालय उघडल्यानंतर सुरज देसाई यांनी कार्यालयातच गळफास घेतल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. किन्हई गावासह कार्यालयाच्या अखत्यारित येत असलेल्या ग्रामीण भागामध्ये देसाई यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी कार्यालय परिसरात गर्दी केली होती.

कुटुंबियांसमक्ष मृतदेह उतरवला
सायंकाळी साडेप‍ाच वाजण्याच्या सुमारास गारगोटीहून वडील सुधीर देसाई यांच्यासह कुटुंबीय व नातेवाईक किन्हई येथे दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत मृतदेह खाली घेण्यात आला. त्यानंतर कोरेगावच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाले. महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील माने, उपकार्यकारी अभियंता उत्तम मंचरे (वाठार स्टेशन), अभिजित महामुनी (कोरेगाव) यांच्यासह जिल्ह्याच्या विविध भागातून सहाय्यक अभियंते, शाखा अभियंत्यांनी किन्हईत गर्दी केली होती.

चांगल्या कामाची दखल
गारगोटी, जि. कोल्हापूर येथील शेतकरी कुटुंबातील विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झालेले सुरज देसाई हे काही महिन्यांपूर्वीच कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले होते. त्यांच्या चांगल्या कामाची पध्दत पाहून वीज वितरण कंपनीमध्ये कायम करण्यात आले होते. वाठार स्टेशन उपविभागीय कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात किन्हई येथे हे शाखा कार्यालय आहे. तेथे कनिष्ठ अभियंता म्हणून ते काम करत होते.

नैराश्यातून आत्मघात ?
किन्हई शाखा कार्यालयाच्या अखत्यारित येत असलेल्या ग्रामीण भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे देसाई हे संतप्त झाले होते. त्यांनी कर्मचार्‍यांना देखील दिवसा आणि रात्री गस्त घालण्याबाबत सूचना दिल्या होत्या. कामामध्ये अत्यंत प्रामाणिक असलेले देसाई हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्येतून वाटचाल करत होते, असे सांगण्यात येते.

चिठ्ठीचे गूढ
कोरेगावचे पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्यासह सातारारोडचे सहाय्यक निरीक्षक संतोष साळुंखे यांनी घटनास्थळी भेट दिली. तेथे एक चिठ्ठी मिळून आली आहे. या चिठ्ठीत काय आहे, हे समजू शकले नाही. कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे तपास करत आहेत.

चिठ्ठी सापडली, जाबजबाब नोंदविणार
किन्हई येथे आत्महत्या केलेल्या सुरज देसाई यांची चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस मुख्यालयातून आलेल्या फॉरेन्सिक विभागाने नमुने गोळा केले आहेत. कुटुंबीय, महावितरण कंपनीतील अभियंते आणि कर्मचार्‍यांचे जाब जबाब नोंदविले जाणार आहेत. त्यानंतर आत्महत्येमागील कारण समजू शकेल, असे पोलीस उपाअधिक्षक गणेश किंद्रे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.