ETV Bharat / state

VIDEO : खंडोबाच्या लग्नाला जमले तब्बल आठ लाख वऱ्हाडी, पालीमध्ये पार पडला शाही विवाह सोहळा..

खंडोबाच्या नावानं चांगभलं... येळकोट.. येळकोट.. जय मल्हार आणि सदानंदाचा येळकोटच्या जयघोषाने खंडोबाची पालनगरी बुधवारी दुमदुमून गेली. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून आलेल्या सुमारे आठ लाख भाविकांनी खोबरे अन् भंडार्‍याच्या केलेल्या उधळणीने खंडोबाची पाली पिवळ्या धमक रंगात न्हाऊन निघाली. गोरज मुहूर्तावर मल्हारी आणि म्हाळसा यांचा राजेशाही विवाह सोहळा भाविकांनी अनुभवला..

Eight lakh Devotees gathered in Pali Satara to Celebrate marriage of God Khandoba
VIDEO : खंडोबाच्या लग्नाला जमले तब्बल आठ लाख वऱ्हाडी, पालीमध्ये पार पडला शाही विवाह सोहळा..
author img

By

Published : Jan 9, 2020, 1:40 AM IST

सातारा - 'खंडोबाच्या नावानं चांगभलं..', 'येळकोट.. येळकोट.. जय मल्हार!' आणि 'सदानंदाचा येळकोट!'च्या जयघोषाने पालनगरी बुधवारी दुमदुमून गेली. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून आलेल्या सुमारे आठ लाख भाविकांनी खोबरे अन् भंडार्‍याच्या केलेल्या उधळणीने खंडोबाची पाली पिवळ्या धम्मक भंडार्‍यात न्हाऊन निघाली. गोरज मुहूर्तावर मल्हारी आणि म्हाळसा यांचा राजेशाही विवाह सोहळाही भाविकांनी अनुभवला. या सोहळ्यासाठी आलेल्या गर्दीमुळे तारळी नदीचे वाळवंट फुलून गेले होते.

खंडोबाच्या लग्नाला जमले तब्बल आठ लाख वऱ्हाडी, पालीमध्ये पार पडला शाही विवाह सोहळा..

कराड तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा असलेल्या ऐतिहासिक पालीच्या खंडोबा यात्रेला बुधवारी प्रारंभ झाला. जिल्हा प्रशासनाने यात्रेतील जुन्या प्रथांमध्ये बदल केल्यामुळे बरीच विघ्ने कमी झाली आहेत. मिरवणूक मार्गावरील ताणही कमी करण्यात प्रशासन यशस्वी झाले. त्यामुळे, दरवर्षी होणारे भाविकांचे हाल टळले. सुरक्षेच्या दृष्टीने वाढवलेल्या निर्बंधांमुळे भाविकांना दर्शन घेताना त्रास झाला. मात्र, एकंदरीतच प्रशासनाने नव्याने राबवलेला हा अभिनव प्रयोग यशस्वी ठरला.

भंडारा आणि खोबर्‍याची उधळण करण्यासाठी भाविक तारळी नदीपात्राच्या दक्षिणोत्तर परिसरात जमले होते. त्यामुळे नदीचे वाळवंट गर्दीने फुलून गेले होते. पाल नगरीत खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी जमलेला भाविकांचा अथांग जनसागर यावेळी भंडार्‍यात न्हाऊन निघाला. खंडोबा-म्हाळसाच्या शाही विवाह सोहळ्यासाठी विविध गावांमधील खंडोबाचे मानकरी, मानाचे गाडे, सासन काठ्या, पालख्या आणि मार्तंड देवस्थानच्या आकर्षक रथातून प्रमुख मानकरी देवराज पाटील यांना घेऊन निघालेली शाही मिरवणूक लक्षवेधी ठरली.

असा पार पडला विवाह सोहळा..

दुपारी 4 वाजता पाटील हे देवाचे मुखवटे पोटावर बांधून अंधार दरवाजा जवळ आल्यानंतर रथात विराजमान झाले. त्यानंतर मिरवणुकीला सुरूवात झाली. फुलांनी सजवलेल्या अबदागिरी, चोपदाराचा घोडा, सासन काठ्या, पालखी, मानाचे गाडे आणि त्या पाठोपाठ शाही थाटात खंडेराया व म्हाळसा यांना रथातून घेवून निघालेले मानकरी, अशी भव्य मिरवणूक मुख्य चौकात येताच भाविकांनी भंडारा-खोबर्‍याची उधळण करत 'सदानंदाचा येळकोट..', 'येळकोट.. येळकोट.. जय मल्हार'चा जयघोष केला. देवस्थान ट्रस्ट आणि यात्रा कमिटीसह प्रशासनाने समांतर पूल उभारल्याने तारळी नदीच्या मुख्य पूलावरील गर्दीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. त्यानंतर, वाळवंटातून देवाची शाही मिरवणूक गोरज मुहूर्तावर मारूती मंदीरमार्गे बोहल्याजवळ आली. यावेळी खंडेरायाच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर पारंपारीक पद्धतीने लाखो भाविकांच्या उपस्थितीत खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा थाटात पार पडला.

यात्रा निर्विघ्न पार पाडण्यासाठी पाली ग्रामपंचायत, यात्रा कमिटी, देवस्थान ट्रस्ट, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्यास जिल्हा प्रशासनाने चागंले नियोजन करून परिश्रम घेतले.

हेही वाचा : मराठी कवितेचे जनक बा. सी. मर्ढेकरांच्या नशिबी उपेक्षाच!

Intro:खंडोबाच्या नावानं चांगभलं... येळकोट.. येळकोट.. जय मल्हार आणि सदानंदाचा येळकोटच्या जयघोषाने खंडोबाची पालनगरी बुधवारी दुमदुमून गेली. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून आलेल्या सुमारे आठ लाख भाविकांनी खोबरे-आणि भंडार्‍याच्या केलेल्या उधळणीने खंडोबाची पाली पिवळ्या धम्मक भंडार्‍यात न्हाऊन निघाली. गोरज मुहूर्तावर मल्हारी आणि म्हाळसा यांचा राजेशाही विवाह सोहळाही भाविकांनी अनुभवला. तारळी नदीचे वाळवंट भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. मंदीराच्या प्रवेशद्वारावरील गर्दी आवरताना पोलिसांची दमछाक झाली. Body:
  कराड (सातारा) - खंडोबाच्या नावानं चांगभलं... येळकोट.. येळकोट.. जय मल्हार आणि सदानंदाचा येळकोटच्या जयघोषाने खंडोबाची पालनगरी बुधवारी दुमदुमून गेली. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून आलेल्या सुमारे आठ लाख भाविकांनी खोबरे-आणि भंडार्‍याच्या केलेल्या उधळणीने खंडोबाची पाली पिवळ्या धम्मक भंडार्‍यात न्हाऊन निघाली. गोरज मुहूर्तावर मल्हारी आणि म्हाळसा यांचा राजेशाही विवाह सोहळाही भाविकांनी अनुभवला. तारळी नदीचे वाळवंट भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. मंदीराच्या प्रवेशद्वारावरील गर्दी आवरताना पोलिसांची दमछाक झाली. 
    कराड तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा असलेल्या ऐतिहासिक पालीच्या खंडोबा यात्रेला बुधवारी प्रारंभ झाला. जिल्हा प्रशासनाने यात्रेतील जुन्या प्रथांमध्ये बदल केल्यामुळे बरीच विघ्ने कमी झाली आहेत. मिरवणूक मार्गावरील ताणही कमी करण्यात प्रशासन यशस्वी झाले. त्यामुळे भाविकांचे हाल टळले. भाविकांना दर्शन घेताना त्रास झाला. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने केलेला प्रयोग यशस्वी झाला. 
   भंडारा आणि खोबर्‍याची उधळण करण्यासाठी भाविक तारळी नदीपात्राच्या दक्षिणोत्तर परिसरात जमले होते. त्यामुळे नदीचे वाळवंट भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. पाल नगरीत खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी जमलेला भाविकांचा अथांग जनसागर यावेळी भंडार्‍यात न्हाऊन निघाला. खंडोबा-म्हाळसाच्या शाही विवाह सोहळ्यासाठी विविध गावांमधील खंडोबाचे मानकरी, मानाचे गाडे, सासन काठ्या, पालख्या आणि मार्तंड देवस्थानच्या आकर्षक रथातून प्रमुख मानकरी देवराज पाटील यांना घेऊन निघालेली शाही मिरवणूक लक्षवेधी होती. दुपारी 4 वाजता मुख्य मानकरी देवराज पाटील हे देवाचे मुखवटे पोटावर बांधून अंधार दरवाजा जवळ आल्यानंतर रथात विराजमान झाले. त्यानंतर मिरवणुकीला सुरूवात झाली. 
  फुलांनी सजवलेल्या अबदागिरी, चोपदाराचा घोडा, सासन काठ्या, पालखी, मानाचे गाडे आणि त्या पाठोपाठ शाही थाटात खंडेराया व म्हाळसा यांना रथातून घेवून निघालेले मानकरी, अशी भव्य मिरवणूक मुख्य चौकात येताच भाविकांनी भंडारा-खोबर्‍याची उधळण करत सदानंदाचा येळकोट.. येळकोट.. येळकोट.. जय मल्हारचा जयघोष केला. देवस्थान ट्रस्ट आणि यात्रा कमिटीसह प्रशासनाने समांतर पूल उभारल्याने तारळी नदीच्या मुख्य पूलावरील गर्दीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले.
   वाळवंटातून देवाची शाही मिरवणूक गोरज मुहूर्तावर मारूती मंदीरमार्गे बोहल्याजवळ आली. यावेळी खंडेरायाच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर पारंपारीक पद्धतीने लाखो भाविकांच्या उपस्थितीत खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा थाटात पार पडला. यात्रा निर्विघ्न पार पाडण्यासाठी पाली ग्रामपंचायत, यात्रा कमिटी, देवस्थान ट्रस्ट, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्यास जिल्हा प्रशासनाने चागंले नियोजन करून परिश्रम घेतले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.