ETV Bharat / state

कोरोनामुळे न्यायालयाचे कामकाज दुपारपर्यंतच; एकतर्फी निकाल अथवा वॉरंट न काढण्याची सूचना

author img

By

Published : Mar 18, 2020, 8:08 AM IST

कोरोनाच्या धसक्याने शासकीय कार्यालयांत शुकशुकाट जाणवत असून न्यायालयाचे कामकाज दुपारी अडीचपर्यंत उरकण्याच्या सूचना उच्च न्यायालयाने केल्या आहेत. एकतर्फी निका अथवा आरोपीला वॉरंट काढू नये अशाही सुचना देण्यात आल्या आहेत.

due-to-the-corona-virus-court-proceedings-will-be-completed-by-afternoon
कोरोनामुळे न्यायालयाचे कामकाज दुपारपर्यंतच

सातारा - कोरोनाच्या धसक्याने शासकीय कार्यालयांतही आता शुकशुकाट जाणवणार आहे. न्यायालयाचे कामकाज दुपारी अडीचपर्यंत उरकण्याची सूचना उच्च न्यायालयाने केली आहे. एकतर्फी निकाल अथवा आरोपीला वॉरंट काढू नये, असेही उच्च न्यायालयाने परिपत्रकात म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने एक परिपत्रक काढले आहे. कराडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात ते दुपारी मिळाले. हे परिपत्रक नोटीस बोर्डवर लावण्यात आले आहे. परिपत्रकातील सूचनेनुसार मंगळवारी दुपारी अडीच पर्यंत न्यायालयीन कामकाज उरकण्यात आले. त्यानंतर वकीलांच्या कक्षाला कुलूप लावण्यात आले. पक्षकारांनाही दुपारी बारापर्यंत पुढील तारखा देण्यात आल्या. दुपारी अडीचनंतर न्यायालयात कोणालाही थांबू देऊ नये, असेही उच्च न्यायालयाच्या परिपत्रकात म्हटले आहे.

उच्च न्यायालयाची सूचना लक्षात घेऊन अटक करण्यात आलेल्या आरोपींना दुपारी बारापर्यंत न्यायालयात हजर करावे, असे कराड जिल्हा व सत्र न्यायालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यांना न्यायालयाच्या अधीक्षकांनी कळविले आहे. कोरोनामुळे दुपारी अडीच पर्यंतच न्यायालयीन कामकाज होणार असल्यामुळे दिवाणी दावे आणि फौजदारी खटल्यांचे कामकाज होऊ शकणार नाही. परिणामी, दुपारी बारापर्यंत पक्षकारांना जून, जुलै महिन्यातील तारीख द्यावी. एकतर्फी निकाल देऊ नये. फौजदारी खटल्यातील आरोपी न्यायालयात हजर न राहिल्यास वॉरंट काढू नये, असेही परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

या परिपत्रकामुळे न्यायालयातील सरकारी कर्मचारीही दुपारी अडीच पर्यंत कामे संपवून घरी जात आहेत. वकिलांच्या कक्षालाही दुपारी कुलूप लावले जात आहे. त्यामुळे बुधवारपासून कराड जिल्हा व सत्र न्यायालयात शुकशुकाट जाणवणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.