ETV Bharat / state

उंब्रजमध्ये शॉर्टसर्किटमुळे चार दुकानांना आग; आगीत लाखो रूपयांची वित्तहानी - उंब्रजमध्ये शॉर्टसर्किटमुळे चार दुकानांना आग

कराड तालुक्यातील उंब्रज येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत रविवारी (19 जानेवारी) चार दुकाने जळून खाक झाली. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

satara
उंब्रजमध्ये शॉर्टसर्किटमुळे चार दुकानांना आग; आगीत लाखो रूपयांची वित्तहानी
author img

By

Published : Jan 21, 2020, 6:55 AM IST

सातारा - कराड तालुक्यातील उंब्रज येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत रविवारी (19 जानेवारी) चार दुकाने जळून खाक झाली. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

उंब्रजमध्ये शॉर्टसर्किटमुळे चार दुकानांना आग; आगीत लाखो रूपयांची वित्तहानी

हेही वाचा - सहावीतल्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाला सक्तमजूरी

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील बाजारपेठेचे गाव असलेल्या उंब्रजमध्ये रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे फूटवेअरच्या दुकानाला आग लागली. सैनिक सहकारी बँकेसमोरील महाराष्ट्र फूटवेअरच्या दुकानाला लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. त्याची झळ नजीकच्या तीन दुकानांना बसली. फूटवेअरचे दुकान आगीत जळून खाक झाले. फुटवेअर दुकानाशेजारील जेनेरिक मेडिकल, वडापाव व चहा सेंटर आणि बेकरीच्या दुकानांनाही आगीची झळ बसली. या आगीत चार दुकानांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. ही आग इतकी भयानक होती की दुकानांना लागलेल्या आगीच्या ज्वाळा गगनाला भिडल्या होत्या आणि परिसरात धुराचे लोटही पसरले होते.

Intro:शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत चार दुकाने जळून खाक झाली. उंब्रज (ता. कराड) येथे रविवारी (दि. 19) रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. Body:
कराड (सातारा) - शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत चार दुकाने जळून खाक झाली. उंब्रज (ता. कराड) येथे रविवारी (दि. 19) रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. 
   पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उंब्रज या बाजारपेठेचे गाव असलेल्या उंब्रजमध्ये रविवारी रात्री 11 च्या सुमारास शॉर्टसर्किटने फूटवेअरच्या दुकानाला आग लागली. सैनिक सहकारी बँकेसमोरील महाराष्ट्र फूटवेअरच्या दुकानाला लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले. त्याची झळ नजीकच्या तीन दुकानांना बसली. फूटवेअरचे दुकान आगीत जळून खाक झाले. फुटवेअर दुकानाशेजारील जेनेेरिक मेडिकल, वडापाव व चहा सेंटर, बेकरीच्या दुकानांनाही आगीची झळ बसली. या आगीत चार दुकानांतील लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. दुकानांना लागलेल्या आगीच्या ज्वाळा गगनाला भिडल्या होत्या. धुराचे लोटही पसरले होते. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.