ETV Bharat / state

माणदेशात वाढली दुष्काळाची दाहकता; नागरिक घेतात चारा छावणीचा आश्रय - जनावरे

माणदेशात दुष्काळाची दाहकता वाढल्यामुळे अनेक नागरिक आपली गावे सोडून जनावरांच्या चारा छावणीत आश्रयाला येत आहेत.

चारा छावणी
author img

By

Published : Feb 6, 2019, 12:56 PM IST

सातारा - जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळ असलेल्या माण-खटाव तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. यामुळे या भागातील लोकांसह शेजारील सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक लोक गावे सोडून आपल्या जनावरांना घेऊन चारा छावणीत येत आहेत.

चारा छावणी
undefined

माण आणि खटावमधील काही भागात प्रशासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. पण चारा छावण्या अजून चालू केल्या नाहीत. मात्र, म्हसवड येथे माणदेशी फाउंडेशन आणि बजाज फाउंडेशनमार्फत खासगी चारा छावणी चालू करण्यात आली आहे. त्यामुळे बळीराजाला दुष्काळासाठी दोन हात करण्यासाठी थोडी का होईना मदत झाली आहे. या ठिकाणी अनेक शेतकरी आपल्या कुटुंबासह राहण्यासाठी आले आहेत. तसेच या ठिकाणी स्वयंपाक करून आपले संसार येथेच थाटले आहेत.

चारा छावणी
undefined

या छावणीत जवळपास ७ ते ८ हजार जनावरे दाखल झाली आहेत. तसेच रोज नवीन जनावरे दाखल होत आहेत. याठिकाणी ओला चारा, सुका चारा, पेंड तसेच शेतकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा दिली जाते. या उपक्रमामुळे सातारा, सांगली आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्यातील काही भागातील जनावरे वाचू शकली आहेत. त्यामुळे शेतकरी कुठे तरी थोडा फार समाधानी आहे.

मात्र, शासनाने सुद्धा दुष्काळाची दखल घेवून या भागात छावण्या चालू करणे गरजेचे आहे. अन्यथा भयानक परस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती येथील सामान्य नागरिकांना व्यक्त केली आहे.

Intro:सातारा
जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळ असलेल्या माण खटाव तालुक्यातील तसेच शेजारील सांगली व सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिक आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी गावे सोडून आपल्या जनावरांना घेऊन चारा छावणीत येऊ लागले आहेत. प्रशासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. पण चारा छावण्या आजून तरी चालू केल्या नाहीत. मात्र म्हसवड येथे माणदेशी फौंडेशन व बजाज फौंडेशन मार्फत खाजगी चारा छावणी चालू करण्यात आली आहे. त्यामुळे बळीराजाला दुष्काळासाठी दोन हात करण्यासाठी थोडी का होईना मदत झाली आहे.

Body:या ठिकाणी अनेक शेतकरी आपल्या कुटुंबासह राहिला आले आहेत. तसेच या ठिकाणी स्वयंपाक करून आपले संसार इथेच थाटले आहेत.
या छावणीत सात ते आठ हजारांच्या वरती जनावरांची आवक गेली आहे. तसेच रोज नवीन जनावरे दाखल होत आहेत. याठिकाणी ओला चारा, सुका चारा, पेंड तसेच शेतकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा दिली जाते. या उपक्रमामुळे सातारा सांगली सोलापूर या तिन्हीं जिल्ह्यातील काही भागातील जनावरे वाचू शकली आहेत. त्यामुळे शेतकरी कुठे तरी थोडा फार समाधानी आहे.
शासनाने याची कुठे तरी दखल घेवून छावण्या सर्व भागात चालू करणे गरजेचे आहे. अन्यथा भयानक परस्थिती निर्माण होऊ शकते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.