ETV Bharat / state

साताऱ्यातील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी फुल टल्ली; स्टाफ पण गायब - अरुण जाधव

दहिवडी ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण जाधव दारूच्या निशेत फुल टल्ली होऊन ग्रामीण रुग्णालयात धिंगाणा घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

दहिवडी ग्रामीण रुग्णालय
author img

By

Published : Jul 8, 2019, 11:21 PM IST

सातारा - दहिवडी ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण जाधव दारूच्या निशेत फुल टल्ली होऊन ग्रामीण रुग्णालयात धिंगाणा घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर माहिती घेण्यासाठी आम्ही गेलो असता. त्या ठिकाणी संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव पुन्हा दारूच्या नशेत कपडे काढून धिंगाणा घालताना दिसून आले.

साताऱ्यातील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी फुल टल्ली; स्टाफ पण गायब

याबद्दल रुग्णालयात चौकशी केली असता संबंधित डॉक्टरांची चौकशी दुपारी करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, एका तासातच डॉक्टरने पुन्हा दारूच्या नशेत डॉक्टर निवासस्थानात कपडे काढून धिंगाणा सुरू केला होता. सिगरेट तसेच दारूच्या नशेत यावेळी निवासस्थानात ते पाहायला मिळत होते. त्यांची ड्युटी गोंदवले येथे असून देखील ते इथे असल्याने नागरिक संतप्त झाले होते.

यावेळी आम्ही पाहणी केली असता. रुग्णालय परिसरात दारूच्या बाटल्या तसेच सिगारेटची पाकिटे निवस्थानात तसेच मागच्या बाजूला टाकण्यात आले असल्याचे दिसून आले. यावरती प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणारे आहे. कारण तीन दिवसांपूर्वी असाच राडा झाला होता. मात्र, त्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती. तसेच सातारा येथे वैद्यकीय चिकित्सा गाडीवर नागरिकांनी या संदर्भात कॉल केला असता त्यांनी देखील उडवा उडवीची उत्तर देऊन कॉल कट केल्याचे सांगितले. नक्की अशा प्रकरणाला कोण पाठीशी घालते हे देखील बघणे गरजेचे ठरणार आहे.

Intro:सातारा दहिवडी
ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण जाधव दारूच्या व सिगरेटच्या निशेत फुल टल्ली होऊन ग्रामीण रुग्णालयात धिंगाणा घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावरती आज माहिती घेण्यासाठी आम्ही गेलो असता. त्या ठिकाणी संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव पुन्हा दारूच्या नशेत कपडे काढून धिंगाणा घालताना दिसून आले आहेत. तसेच याबद्दल रुग्णालय चौकशी केली असता संबंधित डॉक्टरांची चौकशी दुपारी करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. मात्र एका तासातच डॉक्टरने पुन्हा दारूच्या नशेत डॉक्टर निवासस्थानात कपडे काढून धिंगाणा सुरू केला होता. सिगरेट तसेच दारूच्या नशेत यावेळी निवासस्थानात पाहायला मिळत होते.त्यांची ड्युटी गोंदवले येथे असून देखील ते इथे असल्याने नागरिक संतप्त झाले होते.Body:यावेळी आम्ही पाहणी केली असता. हॉस्पिटल परिसरात दारूच्या बाटल्या तसेच सिगारेटची पाकिटे निवस्थानात तसेच मागच्या बाजूला टाकण्यात आले असल्याचे दिसून आले आहेत. यावरती प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणारे आहे.कारण तीन दिवसांपूर्वी असाच राडा केला होता. मात्र त्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती. तसेच सातारा येथे वैद्यकीय चिकित्सा गाडीवर यांना नागरिकांनी या संदर्भात कॉल केला असता त्यांनी देखील उडवा उडवीची उत्तर देऊन कॉल कट केल्याचे सांगितले आहे. नक्की अशा प्रकरणाला कोण पाठीशी घालते हे देखील बघणे गरजेचे ठरणार आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.