सातारा - महापूराने कृष्णा, कोयना, वारणेला आलेल्या पावसाने जनतेचे चांगलेच हाल झाले आहेत. अशातही मानवतेचा धडा देणाऱ्या साताऱ्यातील गावकऱ्यांनी अडलेल्या प्रवाशांच्या जेवनाची सोय केली आहे. या नागरिक व गावकरी यांच्या सोबत ईटिव्ही भारतच्या प्रतिनीधीने बातचीत केली आहे.
सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये भयभीत करणारऱ्या महापुराने नदीकाठची गावे धास्तावली आहेत. तर दुसरीकडे पुणे-बंगलोर महामार्ग क्रमांक 4 पूर्णपणे 3 दिवस ठप्प झाला आहे. त्यामुळे अनेक प्रवासी वाहन चालक या तिन्ही जिल्ह्यात अडकून पडले आहेत. यांना मदत करण्यासाठी आपल्या भागात पुराचा फटका बसला असून सुद्धा या तिन्ही जिल्ह्यातील वाड्या वस्तीवरील नागरिक, सामाजिक संस्था, मित्र मंडळ, व्यापारी, राजकीय व्यक्ती पुढे येऊन मदत करत आहेत. या ठिकाणी अडकून पडलेल्या वाहन चालक व प्रवाशी वर्ग यांना अन्नाची पाकिटे, पिण्यासाठी पाणी, जेवणाची सोय स्थानिकांकडून केली जात आहे. सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरु आहे.
सांगलीतील महापुराच्या पाण्याने घरादारासह अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे. दुसरीकडे वर्षानुवर्षं दुष्काळाने कंबरडे मोडलेले आटपाडीकर, माणदेश पुराच्या पाण्याची मागणी करतायेत. दोन्ही भागांचे दु:ख भयावह आहे.
आपल्या देशाचा नागरिक अडचणीत सापडल्याचे कळताच दुष्काळग्रस्त भागातील असो की पूरग्रस्त, आपली दुख: पाजळता अडचणीत सापडलेल्या आपल्या बांधवांच्या मदतीला धावून जाणे हे आद्य कर्तव्य येथील नागरिक बजावत आहेत.