ETV Bharat / state

गुणवत्तापूर्ण बी-बियाणे आणि खते मिळावे यासाठी कृषी विभाग दक्ष – कृषिमंत्री - दादा भुसे न्यूज

शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते आणि बी-बियाणे मिळावे, यासाठी शासन आग्रही असून यावर कृषी विभागाचे लक्ष आहे. प्रत्येक खत, बी-बियाणे विकणाऱ्या दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या बाहेर दर्शनी भागात दररोज किती साठा आहे आणि दर काय आहेत, हे ठळकपणे फलकावर लावावे, अशा सूचना राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी दिल्या आहेत.

department of agriculture is keen to get farmer good quality seeds and fertilizers for agriculture
गुणवत्तापूर्ण बी-बियाणे आणि खते मिळावे यासाठी कृषी विभाग दक्ष – कृषीमंत्री
author img

By

Published : Jun 25, 2020, 11:01 AM IST

सातारा - शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते आणि बी-बियाणे मिळावे, यासाठी शासन आग्रही असून यावर कृषी विभागाचे लक्ष आहे. प्रत्येक खत, बी-बियाणे विकणाऱ्या दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या बाहेर दर्शनी भागात दररोज किती साठा आहे आणि दर काय आहेत, हे ठळकपणे फलकावर लावावे, अशा सूचना राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी दिल्या आहेत. सातारा जिल्ह्याच्या खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार महेश शिंदे, प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील, कृषी विभागाचे कोल्हापूर विभागाचे सहसंचालक दशरथ तांबाळे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत उपस्थित होते. 'शेतकऱ्यांना वर्षभर पुरेल एवढा युरियाचा साठा जिल्ह्याला मिळेल. मात्र शेतकऱ्यांनी पीक जोमात येते म्हणून अधिक खताचा मारा करू नये, त्यामुळे जमिनीचा पोत खराब होतो. त्यामुळे योग्य ते प्रमाण वापरून उत्पादन कसे वाढेल याकडे लक्ष द्यावे. नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार प्रोत्साहन देईल, असेही यावेळी भुसे यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यातील एक शेतकरी जिरेनियम या सुगंधी वनस्पतीची लागवड करतो, अशी माहिती खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली. नैसर्गिक रंगाच्या शेतीला मोठा वाव आहे, ही बाब आमदार महेश शिंदे यांनी निदर्शनास आणून दिली. या दोन्ही गोष्टी नावीन्यपूर्ण असून राज्याचा कृषिमंत्री म्हणून याबाबतीत काय करता येईल याचा सकारात्मक विचार करू, असे यावेळी भुसे यांनी सांगितले.

कृषिमंत्री पोहोचले बांधावर -

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात ग्राम बीजोत्पादन अंतर्गत उत्पादित सोयाबीन बियाणे पेरणी केलेले उडतारे गावचे सुनील जगताप या शेतकऱ्याच्या प्लॉटला कृषिमंत्री भुसे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार महेश शिंदे यांनी भेट दिली. यावेळी टोकण पद्धतीने सरीवर सोयाबीन पेरणी केल्याने एकरी फक्त 15 किलो बियाणे लागत असल्याने, उत्पादन खर्चात बचत झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले. तसेच या पद्धतीने एकरी उत्पादन 20 क्विंटल घेतल्याचे सांगितले. यावेळी सोयाबीन पिकाची उगवण 100 टक्के झालेली असल्याने कृषिमंत्री यांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा - शेतकर्‍यांना हेक्टरी 50 ते 60 लाख रुपये दर मिळावा- शिवेंद्रसिंहराजे भोसले

हेही वाचा - सातारा : पाडळी येथे जुगार अड्ड्यावर छापा, ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.