ETV Bharat / state

सातारा : सततचा दुष्काळ आणि रोगामुळे जिल्ह्यात डाळिंब बागांखालील क्षेत्र घटले.. - fruits

सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना डाळिंबाच्या बागांमधून हेक्टरी लाखो रुपयांचे विक्रमी उत्पादन घेतले.

सततचा दुष्काळ आणि रोगामुळे जिल्ह्यात डाळिंब बागांखालील क्षेत्र घटले
author img

By

Published : May 5, 2019, 2:54 PM IST

सातारा - जिल्ह्यात डाळिंब उत्पादन म्हणजे 'तांबडं सोनं' जसं कोकणात आंबा तसे साताऱ्यात डाळिंब म्हणजे तांबड सोनं जिल्ह्यातील माण-खटाव, कोरेगाव, फलटण, कराड उत्तर या दुष्काळी भागात माळरानावर अनेक शेतकऱ्यांनी हजार हेक्टरच्या आसपास फळबागांची लागवड केली होती. मात्र आता हे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे. काही बागा शेवटच्या घटका मोजत आहेत. दुष्काळावर मात करीत अनेक शेतकऱ्यांनी माळरानावर डाळिंबाच्या बागा फुलवल्या. मात्र सातत्याने दुष्काळ तसेच तेल्या रोगाचा प्रादुर्भाव असल्याने डाळिंबाच्या बागा मोडीत निघू लागल्या आहेत. तर अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा काढून टाकल्या आहेत.

सततचा दुष्काळ आणि रोगामुळे जिल्ह्यात डाळिंब बागांखालील क्षेत्र घटले

कुसळच्या रानात कमी पाण्यावर निचऱ्याच्या मुरमाड जमिनीत डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. पाणी वाचवण्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा सर्रास वापर करण्यात आला होता. त्याचबरोबर ठिबक सिंचन यंत्रणा मधून खत औषधे सोडण्यात मदत होत होती. परिणामी मनुष्यबळ कमी लागत असे बहुतांश शेतकऱ्यांनी भगव्या वाणीची लागवड केलेली.
सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना डाळिंबाच्या बागांमधून हेक्टरी लाखो रुपयांचे विक्रमी उत्पादन घेतले. तसेच निर्णय क्षमता दर्जेदार असल्याने परदेशातील मागणी वाढू लागली मात्र सातत्याने दुष्काळाच्या झळा निर्माण होत असताना पाण्याच्या तुटवड्याने बागायतदार शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बागा पाण्याअभावी जळून गेले आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या जमिनीत झाडांची खोरटे आहेत. लाखो रुपये खर्च टाकून उभ्या केलेल्या बागा जाळताना पाहून शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी उभे राहते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडून मदतीची मागणी करत आहेत.

Intro:जिल्ह्यात डाळिंब उत्पादन म्हणजे "तांबडं सोनं" जसं "कोकणात आंबा तसं साताऱ्यात डाळिंब म्हणजे तांबड सोन" जिल्ह्यातील माण-खटाव, कोरेगाव, फलटण, कराड उत्तर या दुष्काळी भागात माळरानावर अनेक शेतकऱ्यांनी हजार हेक्टरच्या आसपास फळबागांची लागवड केली होती. मात्र आता हे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे. अनेक बागांचे सध्या खराटे झाल्याचे पाहायला मिळत आहेत. तर काही बागा शेवटच्या घटका मोजत आहेत. दुष्काळावर मात करीत अनेक शेतकऱ्यांनी माळरानावर डाळिंबाच्या बागा फुलवल्या, मात्र सातत्याने दुष्काळ तसेच तेल्या रोगाचा प्रादुर्भाव असल्याने डाळिंबाच्या बागा मोडीत निघू लागल्या आहेत. तर अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा काढून टाकले असून काही भागांचे खराडे झाले आहेत.

Body:कुसळच्या रानात कमी पाण्यावर निचऱ्याच्या मुरमाड जमिनीत डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. पाणी वाचवण्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा सर्रास वापर करण्यात आला होता. त्याचबरोबर ठिबक सिंचन यंत्रणा मधून खत औषधे सोडण्यात मदत होत होती. परिणामी मनुष्यबळ कमी लागत असे बहुतांश शेतकऱ्यांनी भगव्या वाणीची लागवड केलेली.

सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना डाळिंबाच्या बागांमधून हेक्टरी लाखो रुपयांचे विक्रमी उत्पादन घेतले. तसेच निर्णय क्षमता दर्जेदार असल्याने परदेशातील मागणी वाढू लागली मात्र सातत्याने दुष्काळाच्या झळा निर्माण होत असताना पाण्याच्या तुटवड्याने बागायतदार शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बागा पाण्याअभावी जळून गेले आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या जमिनीत झाडांची खोरटे आहेत. लाखो रुपये खर्च टाकून उभ्या केलेल्या बागा जाळताना पाहून शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी उभे राहते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडून मदतीची मागणी करत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.