ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमधील बळींची संख्या पोहोचली 37 वर!

महाबळेश्वर तालुक्यातील घावरी येथील एका पुरुषाचा दरड कोसळलयाने मृत्यू झाला. पाटण तालुक्यातील भुस्खलनामुळे गाडले गेलेल्या लोकांचे शोध व बचाव काम सुरू आहे.

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमधील बळींची संख्या
death toll reaches to 37 in satara
author img

By

Published : Jul 26, 2021, 1:29 AM IST

सातारा - सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या 37 वर पोहोचली आहे. वाई, पाटण, महाबळेश्वर, सातारा, जावली तालुक्यातील भूस्खलनामुळे 26 जण, छत पडून 1, दरड कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. तर पुराच्या पाण्यामुळे 8 जणांचा मृत्यू झाला.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे वाई तालुक्यातील 3 जण, जावली तालुक्यातील 4, पाटण तालुक्यातील 27, सातारा तालुका 2 तर महाबळेश्वर तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. वाई तालुक्यातील कोंढावळे येथील 2 महिलांचा भूस्खलनामुळे तर एका पुरुषाचा छत पडून मृत्यू झाला आहे. जावली तालुक्यातील रेंगडी येथील 2 महिला व वाटंबे येथील एका पुरुषाचा तर मेढा येथील एका पुरुषाचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा-कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी, कराडमधील पूर ओसरला

सातारा तालुक्यात दोघे गेले वाहून!

पाटण तालुक्यातील बोंद्री येथील एक पुरुष, जळव येथील एका पुरुषाचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झाला आहे. मंद्रुळकोळे येथील एका पुरुषाचा दरड कोसळल्याने मृत्यू झाला आहे. आंबेघर तर्फ मरळी येथील 5 पुरुष व 6 महिलांचा तर काहीर येथील एका महिलेचा भूस्खलनामुळे मृत्यू झाला आहे. रिसवड येथील 2 पुरुष व 2 महिलांचा भूस्खलनामुळे मृत्यू झाला आहे. मिरगाव येथील 4 पुरुष व 4 महिलांचा भूस्खलनामुळे मृत्यू झाला आहे. सातारा तालुक्यातील कुस बु येथील वृद्धेचा व कोंडवे येथील युवकाचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे.

हेही वाचा-यवतेश्वर डोंगराच्या पायथ्याची राहणाऱ्या 500 कुटुंबावर तळीयेसारखा प्रसंग येऊ शकतो; तज्ज्ञांचा अंदाज

पाटण तालुक्यात अद्याप 5 बेपत्ता

महाबळेश्वर तालुक्यातील घावरी येथील एका पुरुषाचा दरड कोसळलयाने मृत्यू झाला. पाटण तालुक्यातील भुस्खलनामुळे गाडले गेलेल्या लोकांचे शोध व बचाव काम सुरू आहे. अद्यापही अंदाजित एकूण 5 नागरिक बेपत्ता आहेत. जावली व वाई तालुक्यातील प्रत्येकी 2 व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम प्रगतीपथावर सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

दरम्यान, रविवारी कोयना धरणाच्या पाटलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक कमी झाले आहे. त्यामुळे कोयना धरणाचे दरवाजे साडे पाच फूट करण्यात आले आहेत. पावसानेही उसंत घेतल्यामुळे पाटण आणि कराडमधील पूर ओसरत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.