सातारा : कराड येथील प्रीतिसंगमावर पोहायला गेलेल्या वृद्धावर मगरीने हल्ला केल्याची झाल्याची धक्कादायक ( swimming at Pretisangam in Karad ) घटना समोर आली आहे. मधुकर लक्ष्मण थोरात असे जखमी वृद्धाचे नाव आहे. मगरीच्या हल्ल्यात त्यांच्या पायाला ( Crocodile attack on senior citizen ) जखम झाली आहे.
नदीत पोहण्यासाठी मोठी गर्दी : कराड येथील कृष्णा नदीत पोहायला येणाऱ्यांची मोठी गर्दी असते. रोज पोहायला येणारे तीन मोठे ग्रुपदेखील आहेत. ज्येष्ठ नागरिक देखील व्यायाम आणि पोहण्यासाठी नदीला येतात. आज सकाळी कृष्णा नदीत पोहत असताना मधुकर थोरात या वृद्धावर ( Crocodile attack in Karad ) मगरीने हल्ला केला. प्रीतिसंगम परिसरात हा प्रकार घडला. नदीत अनेक जण पोहत होते. त्यांनी धाव घेतल्याने मधुकर थोरात मगरीच्या तावडीतून वाचले.
मगरीने पकडला पाय : सुमारे तीस जणांचा एक ग्रुप पोहायला आला होता. तीन-चार लोक पोहत नदीच्या मध्यभागी गेले असताना मगरीने मधुकर थोरात यांचा तोंडात पकडला. घाबरून त्यांनी आरडाओरडा केला. पोहणाऱ्या दोन मित्रांनी त्यांच्याकडे धाव घेत त्यांना नदीतून बाहेर काढले. मगरीच्या हल्ल्यात पायाला जखम झाल्याने त्यांना सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या घटनेमुळे पोहणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.