ETV Bharat / state

खाकी अन् खादीमुळेच 'म्हसवड' गुंडाचे आश्रयस्थान - सातारा गुन्हे बातमी

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या ठिकाणी झालेल्या युवकाचा खून असो वा सांगली जिल्ह्यातील खानापूर तहसीलदार यांना झालेली मारहाण यामधील प्रमुख आरोपींना म्हसवड येथेच आधार मिळाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

Satara District News
सातारा जिल्हा बातमी
author img

By

Published : Jun 10, 2020, 5:01 PM IST

सातारा - सांगली, सोलापूर व सातारा या जिल्ह्यातील नामांकित गुंडांच्या पाठीमागे पोलिसांचा लागलेला ससेमिरा चुकवण्यासाठी या तिन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवर असलेले म्हसवड शहर हे गुंडांचे आश्रयस्थान बनल्याची मोठी चर्चा रंगत आहे. याला पाठीशी घालणारे स्वतःला ‘व्हाईट कॉलर’ समजणारे काही पेशावर नेते व डॉक्टर या गुंडांचे आधारस्तंभ बनत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या ठिकाणी झालेल्या युवकाचा खून असो वा सांगली जिल्ह्यातील खानापूर तहसीलदार यांना झालेली मारहाण यामधील प्रमुख आरोपींना म्हसवड येथेच आधार मिळाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. याबाबत प्रशासनामध्ये चर्चा आहे. अगोदरच माण तालुका हा जिल्ह्यातील वाळू माफियांचा हक्काचा अड्डा म्हणून राज्यभर ओळखला जातो, अशात या तालुक्याची नामचीन गुंडांमुळे नवीन ओळख निर्माण होऊ लागली आहे.

ही ओळख निर्माण करण्यासाठी राजकीय नेत्यांसह पोलीस प्रशासनाचा हातभार लागत आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसाच्या कॉलरला हात घालून गुन्हा दाखल होताच फरार झालेला नगरसेवक देखील एका रुग्णालयाचा आधार घेऊन लपला होता. तसेच इतर नामचीन गुंड देखील इथेच आश्रय घेत असल्याचे बोलले जात आहे. याची माहिती स्थानिक प्रशासनला असून देखील नेत्यांच्या सांगण्यावरून त्याला अटक करण्यात आली नाही. हे सगळं नेत्यांचे कार्यकर्ते गावभर सांगत आहेत.

म्हसवड परिसरात जातिवादाला थारा देणारे अधिकारी असतील तर माणच्या कर्तुत्वाला स्वाभिमानाला कलंक लागण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनी याकडे जातीने लक्ष देऊन संबंधितांची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. म्हसवडच्या गुंडागर्दीने सामान्य माणूस मेटाकुटीला आला असताना अशा घटना माणसाठी हितावह नाहीत. याचा कुठे तरी बंदोबस्त होणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने रात्री वाळू चोर सापडतात तसे नामांकित गुंडदेखील पोलिसांनी पकडावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.