ETV Bharat / state

पडळ कारखाना अधिकारी खूनप्रकरणी माजी आमदारासह १९ जणांवर साताऱ्यात गुन्हा

थोरात यांना कराड येथे रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्‍यांच्या कुटुंबीयांनी कारखान्याशी संबंधित लोकांवर खुनाचा आरोप केला आहे.

Satara murder case
Satara murder case
author img

By

Published : Mar 12, 2021, 4:51 PM IST

सातारा - पडळ (ता. खटाव) येथील साखर कारखान्यातील अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, संचालक मनोज व संग्राम घोरपडेंसह एकूण १९ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जबाब झाल्यानंतर खुनाचा आरोप झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला.

अफरातफरीच्या संशयावरून मारहाण

या प्रकरणी पोलिसांनी धरपकड सत्र सुरू केले असून या घटनेने सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. खटाव तालुक्यातील पडळ येथील खटाव-माण अ‌ॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेडया कारखान्यात कार्यरत असणारे केमिस्ट अधिकारी जगदीप धोंडीराम थोरात (वय 40, रा गोवारे, ता. कराड) यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू मारहाणीत झाल्याने गेली दोन दिवस चर्चा होती. जगदीप थोरात यांना कारखान्यावर नोकरी करत होते. तेथे असताना साखरेची अफरातफर केल्याच्या कारणावरून कारखान्याचे संचालक मनोज घोरपडे, संग्राम घोरपडे, प्रभाकर घार्गे, महेश घार्गे, सनी क्षीरसागर, पीए. अंजनकुमार, अशोक नलवडे, शेडगे मामा व अनोळखी 10 ते 12 इसमांनी फायबर काठी, ऊस, सळई तसेच लाथाबुक्यांनी 10 मार्चच्या सायंकाळी साडेपाच ते आठ वाजण्याच्या दरम्यान मारहाण केली.

काही लोक ताब्यात

थोरात यांना कराड येथे रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्‍यांच्या कुटुंबीयांनी कारखान्याशी संबंधित लोकांवर खुनाचा आरोप केला आहे. तसे जाबजबाब पोलिसांनी घेतले. दरम्यान, थोरात यांना गंभीर जखमी करून त्यांचा खून केल्याने कराड शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक भरत पाटील यांनी याबाबतची फिर्याद वडूज पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्राथमिक तपासात काही लोकांना ताब्यात घेतल्याचे समजते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.