ETV Bharat / state

रक्षाबंधन विशेष.! कोरोना प्रादुर्भाव होत असताना कसा साजरा होणार रक्षाबंधनाचा सण? - सातारा जिल्हा बातमी

भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये 'रक्षाबंधन' हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. मात्र, बहिण-भावाचे  नाते अतूट करणारा सण, कोरोना प्रादुर्भावाने साजरा कसा होणार? असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.

Rakshabandhan festival 2020
रक्षाबंधन
author img

By

Published : Aug 3, 2020, 4:50 AM IST

सातारा - भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये 'रक्षाबंधन' हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. मात्र, बहिण-भावाचे नाते अतूट करणारा सण, कोरोना प्रादुर्भावाने साजरा कसा होणार? असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. वाहतूक व्यवस्था, बाजारपेठा ठप्प तर काही भागात कंटेन्मेंट झोन, अशा अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे भाऊ आणि बहीण भेटणार कसे? यामुळे शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात देखील याचा फटका बसला आहे.

स्त्री, मग ती कोणत्याही वयाची असो रक्षाबंधनाच्या उत्सवास तीला माहेरची आस लागलेली असते. लग्नानंतर तिच्या भूमिकेत बदल झाला असला, तरीही माहेरची नाती, ऋणानुबंध ती आपल्या हृदयात कायम जपून ठेवत असते. मुलगी, आई, पत्नी, बहिण, बहिणी अशा भूमिका पार पाडत ती एकाच वेळी आपली अनेक कर्तव्य पार पाडत असते.

रक्षाबंधन सणावर कोरोनाचे सावट...

हेही वाचा - 'महिलांचा सन्मान राखणारा शिवरायांचा महाराष्ट्र हे मुख्यमंत्र्यांनी कृतीतून दाखविण्याची वेळ'

व्यवसाय, रोजगारासाठी घराबाहर पडावे लागत असल्याने सर्व भाऊ एकाच शहरात असणार याची खात्री देता येत नाही. बहिणही लग्न झाल्यावर सासरी जाते. त्यामुळे रक्षाबंधनास प्रत्यक्ष भेट होईलच, असे सांगता येत नाही. बहुतेकवेळा भाऊ बहिणीकडे येऊन रक्षाबंधन साजरे करतात. कधीकधी बहीणही माहेरी येते. रक्षाबंधन हा मने जुळवणारा उत्सव याकडे पाहिले जाते.

लग्न झाल्यानंतर बहिणीस माहेरी जोडून ठेवणारा दुवा म्हणून हा सण निर्णायक भूमिका पार पाडत आसतो. यानिमित्ताने माहेरच्या माणसांशी तिची भेट होत असते. बहीण- भाऊ शेवटी एकाच मायबापांची लेकरे असतात. लहानपणापासून मोठे होईपर्यंत सोबत वाढलेले असतात. परिस्थितीनुरूप बहीण-भाऊ एकमेकांपासून दूर असले तरी त्यांनी लहानपणापासूनच्या आठवणी हृद्यातील कप्प्यात जोपासून ठेवलेल्या असतात. हा चिरंतन ठेवास कठीण प्रसंगी त्यांना आधार देत असतो.

बहीण-भाऊ एकमेकांचे प्रेरणास्त्रोतही असतात. आपली बहीण सुखात राहावी, अशी‍ प्रत्येक भावाची मनोकामना असते. बहीण लहान असली तर भाऊ वडिलांचीच भूमिका पार पाडत असतो. लहानपणी तिला खेळवण्यापासून तिचा प्रत्यके हट्ट पूर्ण करण्यापर्यंत. दादाची ती लाडकी छकुलीच असते. आपल्या छकुलीने चांगले शिकावे, कर्तुत्वनान व्हावे अशीच दादाची इच्छा असते. दादाला जसे आपल्या छकुलीचे मन कळत असते तसेच ताईही आपल्या लाडक्या भावाची काळजी घेत असते. मग ते लहान असोत की मोठे. रक्षाबंधन मनाचे बंध कायम जोडून ठेवण्याचे काम करत असतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.