सातारा- जिल्ह्यातील सुरू असलेला कोरोनाचा आकडा आता कमी होत आहे. मे महिन्यात ज्या झपाट्याने कोरोना बाधितांचा आकडा वाढला त्याच वेगाने जून महिन्यात कोरोनामुक्तीचा आकडा वाढत आहे. मंगळवारी 29 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे कोरोना मुक्तीची टक्केवारी थेट 75 च्या पुढे गेली आहे.
जिल्ह्यात एकूण 745 कोरोनाबाधित रुग्ण असले तरी सध्या केवळ 148 जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील काही तालुक्यात रुग्णसंख्या एकेरी आली आहे. मंगळवारी वेळे, तालुका वाई येथील 50 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याला श्वसनाचाही त्रास होता. सातारा जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीला बाधितांचा आकडा 500 च्या पुढे गेला होता. तेव्हा उपचार घेणाऱ्याचा आकडा 350 वर होता.
जिल्ह्यातील आजची परिस्थिती
एकूण कोरोनाबाधित- 745
एकूण कोरोनामुक्त - 562
बळी - 35