ETV Bharat / state

सातारा : पाटण तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा 200 वर - corona numbers in satara news

जिल्ह्यात सोमवारी तालुक्यातील तारळे येथील एका 63 वर्षीय पुरुष, पाटण येथील 52 वर्षीय पुरुष, नेरळे येथील 51 वर्षीय पुरुष, 45, 15, 28 वर्षीय महिला अशा सहा व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता एकूण बाधितांची संख्या 200 इतकी झाली आहे.

पाटण तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या 200 

author img

By

Published : Jul 21, 2020, 7:47 PM IST

सातारा - जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आत्तापर्यंत एकूण 200 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 84 बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आत्तापर्यंत दहा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर, तब्बल 106 व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

सोमवारी तारळे येथील एका 63 वर्षीय पुरुष, पाटण येथील 52 वर्षीय पुरुष, नेरळे येथील 51 वर्षीय पुरुष, 45, 15, 28 वर्षीय महिला असा सहा व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी नव्याने 23 व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर, प्रलंबित 24 स्वॅब नमुने अहवाल सोमवारी रात्री उशिरा येण्याच्या शक्यता असल्याची माहिती उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात सोमवारी तालुक्यातील तारळे येथील एका 63 वर्षीय पुरुष, पाटण येथील 52 वर्षीय पुरुष, नेरळे येथील 51 वर्षीय पुरुष, 45, 15, 28 वर्षीय महिला अशा सहा व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता एकूण बाधितांची संख्या 200 इतकी झाली आहे. संबंधित बाधित रुग्णांसह यापुर्वीच्या बाधितांवर सध्या कृष्णा व सह्याद्री रुग्णालय कराड, सिव्हिल रुग्णालय सातारा व कोरोना केअर सेंटर पाटण येथे पुढील उपचार सुरू आहेत. या बाधितांच्या संपर्कातील कुटुंबीय व नातेवाईक आदी हाय रिस्कमधील 112 व्यक्तींना पाटण येथील कोरोना केअर सेंटर, प्रियदर्शनी महिला वसतीगृह, मिल्ट्री बॉइज हॉस्टेल व तळमावले येथील कोरोना केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

सोमवारी नव्याने आणखी 23 व्यक्तींचे स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल मंगळवारी रात्री उशिरा तर या अगोदरच्या प्रलंबित 24 स्वॅब नमुने अहवाल सोमवारी रात्री उशिरा येण्याच्या शक्यता आहेत. सध्या एकूण बाधित रुग्णसंख्या 200, पैकी कोरोनामुक्त 106, उपचाराखाली 84 व यात आत्तापर्यंत दहा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.