सातारा - पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची तब्येत चांगली आहे. मात्र, त्यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असल्याने अधिक उपचारासाठी उद्या सकाळी साडेसातपर्यंत मुंबईतील ब्रीच कॅन्डी हाॅस्पिटलला पाठवण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.
सहकारमंत्री पाटील यांना स्वातंत्र्यदिनी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी सिंह, जशराज पाटील व कृष्णाच्या डॉक्टरांशी काहीकाळ चर्चा केली.
पाटील माझे सहकारी आहेत. त्यांच्या तब्येतीच्या चौकशीसाठी आलो होते, असे टोपे म्हणाले. त्यांची तब्येत ठीक आहे. पाटील यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असल्याने त्यांचे चिरंजीव, जिल्हाधिकारी आणि कृष्णा हॉस्पीटलमधील डॉक्टर यांच्याशी चर्चा करून पुढील उपचारासाठी आज साडेसातपर्यंत मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात हालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याचे सहकारमंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री म्हणून ते पुन्हा कामावर येतील, असा विश्वास सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी यावेळी व्यक्त केला.
मंत्री बाळासाहेब पाटलांना मुंबईला हलवणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती - सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम
पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची तब्येत चांगली आहे. मात्र, त्यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असल्याने अधिक उपचारासाठी उद्या सकाळी साडेसातपर्यंत मुंबईतील ब्रीच कॅन्डी हाॅस्पिटलला पाठवण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.