सातारा - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. विधानसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी 125-125 जागांवर लढवणार असून आघाडीतील मित्रपक्षांसाठी 38 जागा सोडण्याचा ठराव झाला आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथील पत्रकार परिषदेत दिली. काही जागांची अदला बदलही होवू शकते तसेच आघाडीत मनसे असेल की नाही याबाबत चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे कडकनाथ कोंबडी प्रकरण मुख्यमंत्र्याकडुन दडपले जाईल, असा आरोपही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
हे ही वाचा - विधानसभा 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं; प्रत्येकी 125 जागा लढवणार
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याबाबत नाशिकमध्ये पत्रकारांना माहिती दिली. काँग्रेस, एनसीपी, शेकाप, जोगेंद्र कवाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर डावे पक्ष एकत्रित निवडणूक लढवतील. विरोधी पक्षात राहण्यात अनेकांची मानसिकता दिसत नाही. मात्र, आपल्याला विरोधी पक्षात राहण्यात अधिक समाधान मिळते, असेही पवारांनी सांगितले. तसेच विधानसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
हे ही वाचा - राष्ट्रवादीचा विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार? वाचा पवार काय म्हणाले..