ETV Bharat / state

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री चार दिवस सुट्टीवर; साताऱ्यातील गावी दाखल

महाबळेश्वर तालुक्यातील आपल्या दरे गावी जात असताना मुख्यमंत्र्यांना खराब हवामानाचा फटका बसला. पावसामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरला साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या हेलिपॅडवर इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागले. त्यानंतर मोटारीने मुख्यमंत्र्यांचा ताफा महाबळेश्वरला रवाना झाले.

Chief Minister Eknath
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Aug 10, 2023, 8:55 PM IST

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या खासगी दौऱ्यावर आले आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील आपल्या दरे गावी जात असताना त्यांना खराब हवामानाचा फटका बसला. पावसामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरला साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या हेलिपॅडवर उतरावे लागले. यामुळे प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली.

मुख्यमंत्री अचानक साताऱ्यात : आज दुपारी मुख्यमंत्री अचानक साताऱ्यात दाखल झाल्याने प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली. महाबळेश्वर तालुक्यातील मुख्यमंत्र्यांच्या दरे या गावी हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. मात्र, महाबळेश्वर परिसरात पावसामुळे हवामान खराब आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरचे लँडिंग करता येत नव्हते. म्हणून सातारा सैनिक स्कूलच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आले.

पालकमंत्र्यांनी केले स्वागत : मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे साताऱ्यात लॅंडींग होत असल्याचा मेसेज मिळताच पालकमंत्री शंभूराज देसाई, पोलीस अधीक्षक समीर शेख हे सैनिक स्कूलच्या मैदानावर दाखल झाले. पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच बुके देऊन स्वागत केले. तसेच सैनिक स्कूलच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात दाखल झाले.

दोन दिवस गावी राहणार : अधिवेशन काळाच्या आधीपासून मुख्यमंत्र्यांना गावी येता आले नव्हते. भात लावणीसाठी स्वतः मुख्यमंत्र्यांना यंदा येता न आल्याने मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे गावी आले होते. मजुरांसोबत त्यांनी चिखलणी आणि भात लावणी केली होती. हेलिकॉप्टरचे साताऱ्यात लॅंडींग झाल्यानंतर मोटारीने मुख्यमंत्री महाबळेश्वरकडे रवाना झाले आहेत. तराफ्यातून (बार्झ) मुख्यमंत्र्यांचा लवाजमा दरे गावी नेला जाणार आहे.

जुलैमध्येही हवामानाचा फटका : मागील महिन्यात (दि. १० जुलै) धुळे शहरात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री अजित पवार धुळ्याकडे रवाना झाल्यानंतर पावसामुळे अचानक हवामान खराब झाले आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना जळगावला उतरावे लागले होते.

हेही वाचा -

  1. CM helicopter break down : मुख्यमंत्र्यांचे साताऱ्यात इमर्जन्सी लँडिंग, महाबळेश्वर दौरा सोडून विश्रामगृहावर रवाना
  2. CM helicopter break down : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, सातारा दौरा आधी रद्द, दुरुस्तीनंतर मुख्यमंत्री कराडकडे रवाना
  3. Air Force Helicopter : तांत्रिक बिघाडामुळे वायूदलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; खांडज गावात खळबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.