ETV Bharat / state

CM Eknath Shinde : पुण्यात भिडे वाडा स्मारक उभारणीच्या कामाला दोन महिन्यात सुरूवात - मुख्यमंत्र्यांची घोषणा

महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अनेक अडचणींवर मात करुन स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांना शिक्षण देण्याचे महान कार्य केले. सर्व बाबींची पुर्तता करुन दोन महिन्यात पुण्यातील भिडे वाडा येथे स्मारकाचे भूमिपूजन (Bhide Wada memorial construction work) केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde Announced) यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात केली.

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde
author img

By

Published : Jan 3, 2023, 9:53 PM IST

Updated : Jan 3, 2023, 10:48 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना

सातारा : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुणे येथील भिडे वाडा येथे स्मारक उभारणीबाबत सर्वबाबींची पुर्तता करुन दोन महिन्यात स्मारकाचे भूमिपूजन केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या स्मारकाच्या माध्यमातून अनेकांना समाजकार्याची प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव (ता खंडाळा)येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

भिडे वाडा हा ऐतिहासिक ठेवा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव आणि कर्मभूमी पुणे होती, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सावित्रीबाईंना घडविण्यात नायगावचा मोठा वाटा आहे. त्यांचा वाडा हा ऐतिहासिक ठेवा आहे. फुले दांपत्यामुळे आज महिलांची विविध क्षेत्रात घोडदौड पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेला स्त्री सक्षमीकरणाचा जागर आदर्शवत आहे. अनेक अडचणींना तोंड देत सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचे कार्य केले.

प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह : सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा घेऊनच राज्य शासन काम करीत आहे. इतर मागास प्रवर्गातील मुले व मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. वसतिगृहांसाठी जागा उपलब्ध करुन घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सुचना केल्या आहेत. महिला सक्षमीकरणासाठी राज्यभरात 2 हजार 800 बचत गटांची निर्मिती करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाच्या निधन झालेल्या कर्त्या पुरुषाच्या पाल्यांसाठी ‘मिशन वात्सल्य’ योजना सुरु करण्यात आली आहे.

महात्मा फुले चित्रपटाच्या अडचणी दूर करणार : खंडाळा तालुक्यातील १४ गावांचा पाणी प्रश्न सोडविण्याबरोबर नायगाव ते मांढरदेव रस्ता पूर्ण करणार आहोत. महात्मा फुले यांच्या जीवनावरील चित्रपटासंबंधी असलेल्या अडचणी दूर करून त्यांचे कार्य सर्वांसमोर येण्यासाठी प्रयत्न केला जाईल. महाज्योतीला आवश्यक तो निधी देणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

इतर मागास विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी : सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून इतर मागास विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत. युपीएससी, एमपीएससी परीक्षाना मार्गदर्शन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. परदेशी शिक्षण घेणाऱ्यांचीही संख्या 50 करण्यात आली आहे. नागपूर येथे ग्रामीण आणि शहरी भागातील वीस विद्यार्थ्यांना पायलटचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

जयंती कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमास साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सहकार व इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार छगन भुजबळ, महादेव जानकर, मकरंद पाटील, माजी मंत्री विजय शिवतारे, नायगावच्या सरपंच साधना नेवसे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Last Updated : Jan 3, 2023, 10:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.