सातारा : येथील शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. सातवीत शिकणारी मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला रिमांड होमध्ये दाखल केले आहे, तर मुलीला शासकीय जिल्हा रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे साताऱ्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
इन्स्टाग्रामवर झाली मैत्री : पीडित मुलगी आणि मुलगा दोघेही वेगवेगळ्या शाळेत शिकत आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांची मैत्री झाली होती. इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलाने सप्टेबर २०२२ मध्ये गोड बोलून तिच्याच घरात तिच्यावर बलात्कार केला होता. मुलगी गरोदर असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर साताऱ्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
तपासणीमुळे प्रकार उघड : नियमित मासिक पाळी आली नाही. त्यामुळे मुलीला तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर मुलगी गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. खेळण्या बागडण्याच्या वयात अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर रहिली आहे. ही माहिती उघडकीस आली तेव्हा परिसरात घटनेबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू झाली. तसेच, पालकांनीही कसेत सतर्क राहावे असेही बोलेले जात आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याने मुलीची सोनोग्राफी : सप्टेंबर २०२२ मध्ये घडलेला प्रकार शाळकरी मुलीने त्यावेळी कोणालाच सांगितला नव्हता. मुलीच्या मासिक पाळीवरुन डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार तिची सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी हा सर्व प्रकार समोर आला. घटना घडली त्यानंतर मुलीने हा प्रकार घरच्यांपासून लपून ठेवला होता. डॉक्टरांना हा प्रकार लक्षात आल्याने त्याचा खुलासा झाला आहे.
पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल : पीडित मुलीच्या आईने शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संबंधित शाळकरी मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला रिमांड होममध्ये दाखल केले असून मुलीला जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. सध्या मुलीवर उपचार सुरू आहेत. परंतु, या गोष्टींपासून मुलांना कसे रोखता येईल याचा विचार सध्या पालकांनी करावा अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.
हेही वाचा : महिला फुटबॉल खेळाडूवर बलात्काराचा प्रयत्न.. फिरायला निघाली अन् नराधमाने शेतातच ओढले