ETV Bharat / state

सातारा हादरले; चिमुकलीचे अपहरणकरून केला अत्याचार - साताऱ्यात अपहरण करून मुलीवर बलात्कार

पीडित मुलगी आपल्या पालकांसोबत झोपलेली असताना सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने तिचे मोटारसायकलवरुन अपहरण केले. नंतर तिला अज्ञातस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. तसेच मुलीला मारहाणही करण्यात आली, असे तक्रारीत ( Girl Abducted and Physical Abuse in Satara ) म्हटले आहे.

सातारा हादरले
चिमुकलीचे अपहरण केला अत्याचार
author img

By

Published : Mar 22, 2022, 12:08 PM IST

सातारा - पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ( Girl Abducted and Physical Abuse in Satara ) पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

पहाटे केले अपहरण -

पीडित मुलगी आपल्या पालकांसोबत झोपलेली असताना सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने तिचे मोटारसायकलवरुन अपहरण केले. नंतर तिला अज्ञातस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. तसेच मुलीला मारहाणही करण्यात आली, असे तक्रारीत म्हटले आहे.

बालिका सापडली जखमी अवस्थेत -

सोमवारी दुपारी साताऱ्याजवळ सोनगावच्या हद्दीत पिडीत मुलगी जखमी अवस्थेत सापडली. त्यानंतर पोलिसांनी पीडितेला रुग्णालयात दाखल केले. तसेच अज्ञाताविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, अपहरण, मारहाण करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेळके अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - काशीनाथाचे चांगभले म्हणत बगाड यात्रेला सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.