ETV Bharat / state

‘त्या’ वादग्रस्त बंगल्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘टाटा’ - अविनाश भोसले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाबळेश्‍वरच्या दौर्‍यावर आहेत. मात्र, दरवर्षीप्रमाणे त्यांनी 'फोर ओक्स'वरील मुक्कामापेक्षा 'राज भवन' या शासकीय विश्रामगृहाला पसंती दिली आहे.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jan 31, 2020, 7:36 PM IST

सातारा - राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्याची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर सातारा जिल्ह्यात ते प्रथमच खासगी दौर्‍यावर येत आहेत. मुख्यमंत्री सातारा दौर्‍यावर येत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडालेली आहे. परंतू दरवर्षीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी अविनाश भोसले यांच्या बंगल्यावर मुक्काम न करता शिष्टाचाराप्रमाणे महाबळेश्‍वर येथील ‘राज भवन’ येथे आपला सहकुटूंब डेरा टाकला आहे. तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्या बंगल्याला ‘टाटा’ केल्यामुळे महाबळेश्‍वरमध्ये हा विषय मोठ्या चवीने चर्चिला जात आहे.

ठाकरे कुटूंब आणि महाबळेश्‍वर हे समीकरण गेली अनेक दशके अव्याहतपणे सुरु आहे. वर्षातून एकदा तरी ठाकरे परिवार दरवर्षी महाबळेश्‍वरमध्ये निसर्गाच्या सानिध्यात येत असतो. खुद्द बाळासाहेब ठाकरे यांना महाबळेश्‍वरबद्दल विशेष प्रेम होते. त्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेही दरवर्षी न चुकता सहकुटूंब महाबळेश्‍वरच्या दौर्‍यावर असतात. 2005 पासून उद्योगपती अविनाश भोसले यांच्या ‘फोर ओक्स’ बंगल्यावर काही दिवसांसाठी ठाकरे परिवाराचा मुक्काम ठरलेला असायचा. गेल्याच वर्षी दिवाळीमध्ये उद्धव ठाकरे सहकुटूंब अविनाश भोसलेंच्या फोर ओक्स बंगल्यात मुक्कामी होते.

हेही वाचा... सकाळी उठण्यावरून अजित पवारांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले...

राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा वाढल्यानंतर शिवसेनेने भाजपला बाजूला सारत कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर घरोबा केला व राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापले. शरद पवारांच्या आग्रहाने उद्धव ठाकरेंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. ठाकरे परिवारातील पहिलाच व्यक्ती एका राजकीय पदावर आल्याने सामान्य शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले. महाबळेश्‍वरातील शिवसैनिकांवर उद्धव ठाकरेंचे विशेष प्रेम आहे. असे असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रथमच आमदार भास्कर जाधव यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने महाबळेश्‍वरच्या दौर्‍यावर आले आहेत. दरवर्षीप्रमाणे त्यांनी फोर ओक्स वरील मुक्कामापेक्षा राज भवन या शासकीय विश्रामगृहाला पसंती दिली आहे. गेल्या दोन वर्षापासून उद्योगपती अविनाश भोसलेंचा फोर ओक्स हा बंगला वादग्रस्त ठरलेला आहे.

हेही वाचा... 'मुंबईच्या 'मातोश्री'चा शक्तीपात, तर दिल्लीची मातोश्री शक्तीशाली'

या बंगल्याच्या हेलिपॅडवर दोन वर्षापूर्वी अनिल अंबानी व धीरज वाधवा यांनी विनापरवाना हेलिकॉप्टर्सचे लॅण्डिंग, टेक-ऑफ केले होते. त्यामुळे हा विषय बराच गाजला होता. तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी बेकायदेशीर लॅण्डिंग, टेक-ऑफ करुनही याविषयी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. जिल्ह्यात इतर ठिकाणी बेकायदेशीर लॅण्डिंग, टेक-ऑफ केले असता संबंधितांवर यापूर्वी गुन्हे दाखल झाले होते. मात्र तत्कालीन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली. अद्यापही त्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. महाबळेश्‍वर यापूर्वीच पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (इको-सेन्सेटिव्ह झोन) म्हणून जाहीर करण्यात आले आहे. असे असतानाही फोर ओक्स बंगल्यातील हेलिपॅडला शासनाने मान्यता दिली होती. याबाबत राष्ट्रीय हरित लवादाकडे यापूर्वीच अनेक तक्रारी झाल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जिल्हा दौर्‍यावर येत असताना प्रशासनाची तारांबळ उडाली होती. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर हे सहा आसनी व डबल इंजिन असल्यामुळे त्याचे पंखही मोठे आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर त्यांचे हेलिकॉप्टर उतरवायचे कोठे, हा प्रश्‍न होता. पोलो ग्राऊंडवर यापूर्वीच हेलिकॉप्टर लॅण्डिंग, टेक-ऑफ करण्यास बंदी घालण्यात आल्यामुळे अखेर उद्धव ठाकरेंचे हेलिकॉप्टर वेण्णा लेक पठारावर उतरवले. गेल्या दोन वर्षापासून महाबळेश्‍वर येथील उद्योगपती अविनाश भोसले यांचा फोर ओक्स बंगला हा वादाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. या बंगल्याबाबत अनेक तक्रारीही प्रशासनाकडे झालेल्या आहेत. असे असताना उद्धव ठाकरे महाबळेश्‍वरमध्ये आल्यानंतर ते फोर ओक्स मध्येच थांबतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र राजशिष्टाचाराप्रमाणे त्यांनी ‘राज भवन’ या शासकीय विश्रामगृहावर थांबण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोठ्या राजकीय वादाची पडणारी ठिणगी यानिमित्ताने शमली आहे.

Intro:सातारा : राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्याची सूत्रे हातात घेतल्यानंतर सातारा जिल्ह्यात ते प्रथमच खाजगी दौर्‍यावर येत आहेत. मुख्यमंत्री सातारा दौर्‍यावर येत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडालेली आहे. परंतू दरवर्षीप्रमाणे मुख्यमंत्री यांनी अविनाश भोसले यांच्या ‘त्या’ वादग्रस्त बंगल्यावर मुक्काम न करता शिष्टाचाराप्रमाणे महाबळेश्‍वर येथील ‘राज भवन’ येथे आपला सहकुटूंब डेरा टाकलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्या वादग्रस्त बंगल्याला ‘टाटा’ केल्यामुळे महाबळेश्‍वरमध्ये हा विषय मोठ्या चवीने चर्चिला जात आहे.

Body:ठाकरे कुटूंब आणि महाबळेश्‍वर हे समीकरण गेली अनेक दशके अव्याहतपणे सुरु आहे. वर्षातून एकदा तरी ठाकरे परिवार दरवर्षी महाबळेश्‍वरमध्ये निसर्गाच्या सानिध्यात येत असतो. खुद्द स्व. बाळासाहेब ठाकरे यांना महाबळेश्‍वरबद्दल विशेष प्रेम होते. त्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेही दरवर्षी न चुकता सहकुटूंब महाबळेश्‍वरच्या दौर्‍यावर असतात. 2005 पासून उद्योगपती अविनाश भोसले यांच्या ‘फोर ओक्स’ बंगल्यावर काही दिवसांसाठी ठाकरे परिवाराचा मुक्काम ठरलेला असायचा. गेल्याच वर्षी दिवाळीमध्ये उद्धव ठाकरे सहकुटूंब अविनाश भोसलेंच्या फोर ओक्स बंगल्यात मुक्कामी होते.
राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा वाढल्यानंतर शिवसेनेने भाजपला बाजूला सारत कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर घरोबा केला व राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापले. शरद पवारांच्या आग्रहाने उद्धव ठाकरेंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. ठाकरे परिवारातील पहिलाच व्यक्ती एका राजकीय संविधानिक पदावर आल्याने सामान्य शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले. महाबळेश्‍वरातील शिवसैनिकांवर उद्धव ठाकरेंचे विशेष प्रेम आहे. असे असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रथमच आ. भास्कर जाधव यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने महाबळेश्‍वरच्या दौर्‍यावर आले आहेत. दरवर्षीप्रमाणे त्यांनी फोर ओक्स वरील मुक्कामापेक्षा राज भवन या शासकीय विश्रामगृहाला पसंती दिली आहे. गेल्या दोन वर्षापासून उद्योगपती अविनाश भोसलेंचा फोर ओक्स हा बंगला वादग्रस्त ठरलेला आहे. या बंगल्याच्या हेलिपॅडवर दोन वर्षापूर्वी अनिल अंबानी व धीरज वाधवा यांनी विनापरवाना हेलिकॉप्टर्सचे लॅण्डिंग, टेक-ऑफ केले होते. त्यामुळे हा विषय बराच गाजला होता. तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी बेकायदेशीर लॅण्डिंग, टेक-ऑफ करुनही याविषयी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. जिल्ह्यात इतर ठिकाणी बेकायदेशीर लॅण्डिंग, टेक-ऑफ केले असता संबंधितांवर यापूर्वी गुन्हे दाखल झाले होते. मात्र तत्कालीन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली. अद्यापही त्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. महाबळेश्‍वर यापूर्वीच पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (इको-सेन्सेटिव्ह झोन) म्हणून जाहीर करण्यात आले आहे. असे असतानाही फोर ओक्स बंगल्यातील हेलिपॅडला शासनाने मान्यता दिली होती. याबाबत राष्ट्रीय हरित लवादाकडे यापूर्वीच अनेक तक्रारी झाल्या आहेत. परंतू अविनाश भोसले या बांधकाम ठेकेदारापुढे यंत्रणांनी शेपट्या घातल्यामुळे याबाबतचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जिल्हा दौर्‍यावर येत असताना प्रशासनाची तारांबळ उडाली होती. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर हे सहा आसनी व डबल इंजिन असल्यामुळे त्याचे पंखही मोठे आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर त्यांचे हेलिकॉप्टर उतरवायचे कोठे, हा प्रश्‍न होता. पोलो ग्राऊंडवर यापूर्वीच हेलिकॉप्टर लॅण्डिंग, टेक-ऑफ करण्यास बंदी घालण्यात आल्यामुळे अखेर उद्धव ठाकरेंचे हेलिकॉप्टर वेण्णा लेक पठारावर उतरवले. गेल्या दोन वर्षापासून महाबळेश्‍वर येथील उद्योगपती अविनाश भोसले यांचा फोर ओक्स बंगला हा वादाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. या बंगल्याबाबत अनेक तक्रारीही प्रशासनाकडे झालेल्या आहेत. असे असताना उद्धव ठाकरे महाबळेश्‍वरमध्ये आल्यानंतर ते फोर ओक्स मध्येच थांबतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र राजशिष्टाचाराप्रमाणे त्यांनी ‘राज भवन’ या शासकीय विश्रामगृहावर थांबण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोठ्या राजकीय वादाची पडणारी ठिणगी यानिमित्ताने शमली आहे.Conclusion:सातारा
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.