सातारा- मुस्लिम धर्माविषयी तेढ निर्माण होईल असा मेसेज व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकून सामाजिक अशांतता होईल, असे कृत्य केले म्हणून पाटण तालुक्यातील मोरगिरी येथे एका युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची नोंद पाटण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी मोरगिरी, ता. पाटण येथील संशयित आरोपी रोहित अनिल गुरव (वय २१ वर्षे) याने दुपारी 3. 30 वाजण्याच्या सुमारास आपल्या मोबाईलवरून मुस्लिम धर्माविषयी तेढ निर्माण होईल, अशी पोस्ट व्हाट्सअॅप ग्रुपवर टाकून सामाजिक अशांतता होईल, असे कृत्य केल्याची घटना घडली.
याबाबतची फिर्याद पाटण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विजय अशोक गुरव यांनी पाटण पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी रोहित गुरव याच्या विरोधात भा. द. वि. कलम 505(2) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास सहाययक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेवाळे करीत आहेत.