ETV Bharat / state

भर उन्हात कर्तव्य बजाविणाऱ्या सातारा पोलिसांना गृह राज्यमंत्र्यांकडून लस्सीचे वाटप

भर उन्हात बंदोबस्तात कार्यरत असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज(मंगळवार) गृहराज्यमंत्री देसाई यांच्यावतीने लस्सीचे वाटप करण्यात आले. त्यांनी प्रातिनिधिक स्वरुपात सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरन्ट चौकात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस्सीचे वाटप केले.

भरऊन्हात कर्तव्य बजाविणाऱ्या सातारा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला दिला थंडावा

author img

By

Published : May 12, 2020, 2:38 PM IST

सातारा - कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरता लॉकडाऊनच्या काळात पोलीस दिवसरात्र एक करुन काम करत आहे. हा बंदोबस्त करताना भरऊनात उभे राहून आपले कर्तव्य बजाविणाऱ्या सातारा जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लस्सीचे वाटप करुन थंडावा दिला आहे.

भरउन्हात बंदोबस्तात कार्यरत असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज(मंगळवार) गृहराज्यमंत्री देसाई यांच्यावतीने लस्सीचे वाटप करण्यात आले. त्यांनी प्रातिनिधिक स्वरुपात सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरन्ट चौकात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस्सीचे वाटप केले. जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, वाई, माण-खटाव, कोरेगांव, फलटण या तालुक्यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यामार्फत सुमारे १ हजार ८७५ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस्सीचे वाटप करण्यात आले.

राज्याचे गृहराज्यमंत्री देसाई यांच्याकडून नेहमीच सामाजीक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यांनी कोरोनाचे संकट वाढत असताना आपला जीव धोक्यात घालून दिवसरात्र बंदोबस्तात कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवले. त्यांच्या आरोग्याची विचारपूस करताना सातारा शहरात फेरफटका मारून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या आरोग्याची तसेच बंदोबस्तामध्ये कसली अडचण नाही ना? याची विचारपूसही केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.