सातारा - साताऱ्यातील संगम माहुली येथे सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास सख्या भावाने बहिणीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वंदना शिंदे असे बहिणीचे नाव असून नंदकुमार माने, असे हत्या करणाऱ्या आरोपी भावाचे नाव आहे.
माहितीनुसार, साताऱ्यातील संगम माहुली येथे राहत असलेल्या नंदकुमार याने त्याची सख्खी बहिण वंदना शिंदे हिची चाकूने भोकसून हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी नंदकुमार याला ताब्यात घेतले आहे. या हत्येमागचे करण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.