सातारा - सातार्यात नगरपालिकेच्या नवीन इमारतीसाठी सुरू असलेल्या खोदकामात ब्रिटिशकालीन बंदुकीची शेकडो काडतुसे आणि काही जुन्या वस्तू सापडल्या आहेत. काडतुसे गंजलेल्या अवस्थेत आहेत. Gun cartridges found during excavation in Satara यासंदर्भातील माहिती मिळताच सातारा शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले.
सापडलेली काडतुसे आणि वस्तू पुरातत्व विभागाकडे जमा केल्या जाणार आहेत. काडतुसे आणि वस्तू ताब्यात घेण्यात आल्या असून त्या गंजलेल्या अवस्थेत आहेत. काडतुसे ही ब्रिटिशकाळातील असावीत, असा अंदाज आहे. Gun cartridges found In Satara ती काडतुसे आणि वस्तू सातार्याच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात ठेवण्यात येणार असल्याची माहिती संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली आहे.
हेही वाचा - Artemis Launch postponed इंजिन खराब झाल्यामुळे आर्टेमिस लाँच पुढे ढकलण्यात आले