ETV Bharat / politics

राजेंद्र गावित यांनी जाहीर केलं 'संकल्प पत्रक'; रोजगार, शिक्षण, आरोग्य, पाणी आदींवर दिला भर - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

शिवसेनेचे उमेदवार माजी खासदार राजेंद्र गावित यांनी रविवारी 'संकल्प पत्रक' जारी केलं. जाहीरनाम्यात शिक्षण, आरोग्य, रोजगार, पाणी, दळणवळण व्यवस्था यावर जास्त लक्ष केंद्रित केलं.

Rajendra Gavit
राजेंद्र गावित संकल्प पत्र (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2024, 7:02 PM IST

Updated : Nov 10, 2024, 8:36 PM IST

पालघर : पालघर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार माजी खासदार राजेंद्र गावित यांनी केलेल्या विकासकामांचा आढावा घेताना, भविष्यात काय करणार? याचं स्वप्न आपल्या संकल्प पत्राच्या माध्यमातून त्यांनी मतदारांना दाखवलं. लायन्स क्लब हॉल पालघर येथे महायुतीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, शिक्षण, आरोग्य, रोजगार, पाणी, दळणवळण व्यवस्था अशा सर्वच बाबींना स्पर्श करत पुढच्या काळात आपण काय करणार आहोत, याचं चित्र त्यांनी मतदारांसमोर उभं केलं. या पत्रकार परिषदेस शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे, शिवसेना प्रवक्ते केदार काळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव आणि घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

मतदारसंघासाठी काय करणार? : गावित हे यापूर्वी आमदार, खासदार, मंत्री होते. प्रशासनाचा त्यांना मोठा अनुभव आहे. आपल्या काळात त्यांनी काय काय कामे पालघर जिल्ह्यात केली, याचा विस्तृत आढावा त्यांनी संकल्प पत्रात घेतला. भावी काळात पालघर विधानसभा मतदारसंघासाठी आपण काय करणार आहोत आणि नागरिकांचं जीवन कसं सुसह्य करणार आहोत याचा आढावा त्यांनी घेतला.

प्रतिक्रिया देताना राजेंद्र गावित (ETV Bharat Reporter)

वचननाम्यात स्थानिकांना रोजगार : गावित यांच्या वचननाम्यात प्रामुख्यानं स्थानिकांना रोजगारात प्राधान्य, स्वयंरोजगार, रस्ते, वीज, पाणी, शिक्षण तसेच आरोग्य सेवा उपलब्ध करणार. शेतकरी आणि मच्छीमार बांधवांच्या मागण्या पूर्ण करणार, व्यावसायिकांना लघुउद्योगांचा दर्जा देणार, पालघर स्वावलंबी आणि नावीन्यपूर्ण बनवणार, अशी पाच वचने मतदारांना दिली. ती पूर्ण करण्यासाठी काय काय करणार याचाही आढावा त्यांनी घेतला. त्याचबरोबर आपली विकास नीती कशी असेल यावर त्यांनी भर दिला.

आधी केले, मग सांगितले : मुंबई, अहमदाबाद महामार्गालगतच्या ७६ गावांना पाणी योजना, मीरा-भाईंदर ते वसई विरारपर्यंत टप्पा क्रमांक १३ अंतर्गत मेट्रो सेवा, पालघर जिल्ह्यातील सहा मोठ्या योजनांसाठी १२४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर, वसई येथे पासपोर्ट कार्यालय, वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी १००१ कोटी रुपयांचा निधी मंजूर, रेल्वे चौपदरीकरणासाठी बाधितांना दुप्पट सानुग्रह अनुदान, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री तसेच वैयक्तिक सहाय्यता निधीतून हजारो रुग्णांची प्रकरणे मंजूर, बिरसा मुंडा ग्रामसडक योजनेतून जिल्ह्यातील २५० न जोडलेल्या गावांची रस्त्यांची कामे, सातपाटी, मासेमारी, बंदर विकास केंद्रासाठी २८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर अशा कामांचा आढावा घेताना यापुढे काय करणार आहोत, हे त्यांनी मतदारांना सांगितलं.

विरार-डहाणूसाठी ३६०० कोटींचा निधी : विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणासाठी ३६०० कोटी रुपये खर्च करून लवकरच विरार डहाणू रेल्वे सेवांची संख्या वाढवणार असल्याचं सांगून गावित म्हणाले की, "मुला-मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांची क्षमता वाढवणे, तसेच घरकुल, वनपट्ट्यांचे दावे मंजूर करणे या कामांना प्राधान्य देणार आहोत. जव्हार येथे २०० खाटांचे रुग्णालय मंजूर झाले असून त्यासाठी ९५ कोटी रुपये दिले आहेत. पालघर जिल्हा रुग्णालयाचे काम प्रगतिपथावर असून लवकरच एक मॉडेल हॉस्पिटल म्हणून ते उदयास येणार आहे. या ठिकाणी मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येणार आहे. ‘अमृत भारत स्थानक’ योजनेंतर्गत पालघर रेल्वे स्थानकाचे अद्ययावत रेल्वे स्थानकामध्ये रूपांतर होणार असून पालघर-विरार आता अर्ध्या तासावर आले आहे. वैतरणा ते सफाळे खाडीवर पुलासाठी ८६० कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली असून हे कामही लवकरच सुरू होईल."

पाणी योजनांना प्राधान्य : "रखडलेल्या पाणी योजना पूर्ण करून त्यासाठी विविध शासकीय संस्थांचा निधी उपलब्ध करून देण्याचं त्यांनी जाहीर केलं. वाडा-पोखरण पाणी योजना, पालघर आणि २६ गावे पाणी योजना तसेच पालघर नगरपालिकेसाठी पाण्याची स्वतंत्र योजना आणि उर्वरित गावांसाठी पाण्याची वेगळी योजना माहीम-केळवेपर्यंत नेण्याचं त्यांनी जाहीर केलं. वेती वरोती आणि साखरा धरणाचे पाणी स्थानिक भूमिपुत्रांना उपलब्ध करून देण्यासाठी वेगळी योजना आखणार. पालघर जिल्ह्यात डायमेकर व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून त्यांच्यासाठी क्लस्टर स्थापन करण्यात येईल. तसेच या व्यवसायाला लघुउद्योगाचा दर्जा देण्यासाठी आपण प्रयत्न करू. त्यामुळं या उद्योगाला बँका सहजपणे कर्ज देऊ शकतील," अशी विविध आश्वासनं गावित यांनी दिली.

पर्यटन विकासावर लक्ष केंद्रीत करणार : पालघर विधानसभा मतदारसंघात अनेक पर्यटन आणि धार्मिक क्षेत्र आहेत. त्यांच्या विकासासाठी निधी आणून पालघर हे पर्यटनाच्यादृष्टीनं आदर्श ठरवणार असल्याचा संकल्प त्यांनी केला. त्यातून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल. पालघर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. येथे अद्ययावत मत्स्य मार्केट, शीतगृहाची व्यवस्था केली जाईल. एमआयडीसीमध्ये तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये नवीन कंपन्यांना परवानगी देताना रोजगारात स्थानिकांना प्राधान्य द्यावं, यासाठी कायदा आणण्याचा मनोदय गावित यांनी व्यक्त केला. याशिवाय जुन्या कंपन्यात नवीन भरती करताना स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी आपण आग्रह धरू, असे ते म्हणाले.

पालघरला कामगार रुग्णालय : राष्ट्रीय हित लक्षात घेऊन या ठिकाणी मोठे प्रकल्प सुरू व्हावेत आणि हे प्रकल्प सुरू झाल्यामुळं गावामध्ये जाणारे रस्ते खराब होऊ नयेत, म्हणून हे रस्ते नवीन करण्यासाठी, राष्ट्रीय प्रकल्पांच्या अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूद करण्यासाठी आपण आग्रह धरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. डिझेलवरील परतावा मच्छीमार सोसायट्यांना एका महिन्यात मिळण्यासाठी योजना तयार करून त्याची अंमलबजावणी करू. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपकेंद्र वसई-विरार भागात सुरू करणार आहे. त्याचा फायदा तलासरी भागातील शेतकऱ्यांना होईल. पालघर येथे कामगार विमा रुग्णालय सुरू करणार असल्याचं गावित यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. उद्धव ठाकरे, तुम्ही कुठे बसलात याची आठवण करून देतो..अमित शाह यांचा हल्लाबोल
  2. महिलांना महिना 3 हजार अन् बसचा मोफत प्रवास; महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध
  3. मतांसाठी लाडक्या बहिणींना धमकी, राजकीय दबाव तंत्राचा वापर, संजय राऊतांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

Last Updated : Nov 10, 2024, 8:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.