ETV Bharat / state

Bori Bar In Satara : साताऱ्यातील सुखेड-बोरीची अनोखी परंपरा शिव्यांच्या लाखोलीत महिलांनी घातला 'बोरीचा बार' - both wives had fight

राज्यात अनेक भागात खूप वेगळ्या आणि अनोख्या प्रथा आहेत. मात्र शिव्या देण्याची अनोखी प्रथा सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात सुखेड आणि बोरी या दोन गावात नागपंचमीचा दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. मागील दोन वर्षे कोरोनामुळे बोरीचा बार ( Bori bar ) होऊ शकला नव्हता. यंदा मात्र वाद्यांच्या कडकडाटात एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहत बोरीचा बार घातला.

Bori bar
बोरीचा बार
author img

By

Published : Aug 4, 2022, 12:25 PM IST

Updated : Aug 4, 2022, 12:38 PM IST

सातारा - दोन वर्षाच्या कोरोनाच्या प्रतिबंधानंतर यंदा नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सुखेड-बोरी गावात महिलांनी एकमेकींना शिव्यांच्या लाखोली वाहत 'बोरीचा बार' घातला. शिव्यांच्या लाखोलीत व वाद्यांच्या कडकडाटात सुखेड-बोरी ( Sukhed-Bori Village In Satara ) गावातील महिलांमध्ये बोरीचा बार( Bori bar ) चांगलाच रंगला होता. यावेळी कडक पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आला ( tight police presence maintain ) होता.

बोरीचा बार

काय आहे बोरीच्या बाराची आख्यायिका ? - बोरीच्या बाराबाबत अशी आख्यायिका ( Story behind Bori bar) सांगितले जाते की, बोरीच्या पाटलाला दोन बायका होत्या ( Bori Village Head had two wives ). एक सुखेड व एक बोरीत राहत होती. दोघी कपडे धुण्यासाठी ओढ्यावर येत असत. एके दिवशी दोन बायकांची भांडणे झाली ( both wives had fight ). भांडणे होऊन ओढ्यातील पाण्यात पडून मृत्यू पावल्या ( After fighting both fell into stream and died ). तो नागपंचमीचा दुसरा दिवस होता. तेव्हापासून दोन्ही गावातील महिलांचा बोरीचा बार घालण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. सुखेड आणि बोरी या दोन गावातील महिला गावच्या वेशीवरील ओढ्याच्या दोन्ही काठावर येऊन हातवारे करत एकमेकींना शिव्या देतात. या शिव्या खूप वेगळ्या प्रकारच्या असतात. या कोणाला ऐकू येऊ नये म्हणून यावेळी पारंपारिक वाद्ये वाजवली जातात.

सुखेड-बोरीची अनोखी प्रथा - राज्यात अनेक भागात खूप वेगळ्या आणि अनोख्या प्रथा आहेत. मात्र शिव्या देण्याची अनोखी प्रथा सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात सुखेड आणि बोरी या दोन गावात नागपंचमीचा दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे बोरीचा बार होऊ शकला नव्हता. यंदा मात्र वाद्यांच्या कडकडाटात एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहत बोरीचा बार घातला.

हेही वाचा - Cabinet Expansion Date : अखेर शिंदे सरकारला मिळाला मुहूर्त; 'या' तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार

Last Updated : Aug 4, 2022, 12:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.