ETV Bharat / state

MLA Gore Case : आमदार जयकुमार गोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला - उच्च न्यायालयाने जयकुमार गोरेंचा जामीन अर्ज फेटाळला

आमदार जयकुमार गोरे ( MLA Jayakumar Gore ) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने ( High court rejects pre-arrest bail application ) आज (मंगळवारी) फेटाळला आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी गोरे यांना न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदत दिली असून तोपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.

MLA Gore Case
MLA Gore Case
author img

By

Published : Jun 14, 2022, 4:56 PM IST

सातारा - खटाव तालुक्यातील मायणी येथील मृत व्यक्तीची बोगस कागदपत्रे बनवून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार जयकुमार गोरे ( BJP district president and MLA Jayakumar Gore ) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने ( High court rejects pre arrest bail application ) आज (मंगळवारी) फेटाळला आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी गोरे यांना न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदत दिली असून तोपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.

बोगस कागदपत्रांद्वारे फसवणूक : खटाव तालुक्यातील मायणी येथील मृत पिराजी भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडीबा घुट्रगडे (रा. विरळी ता. माण), महेश पोपट बोराटे (रा. बिदाल, ता. माण) आणि अज्ञात दोघांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात महादेव पिराजी भिसे यांनी तक्रार दिली होती. त्यावरून गोरेंसह सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. वडूज सत्र न्यायालयाने गोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

आधी दिलासा, नंतर दणका : उच्च न्यायालयाने आमदार गोरे यांना अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले होते. त्यामुळे गोरे यांना दिलासा मिळाला होता. मात्र, दि. ९ जूनपासून पुन्हा या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. आज (मंगळवारी) न्यायालयाने गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत त्यांना धक्का दिला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी गोरे यांना दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. तसेच तोपर्यंत अटक न करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

हेही वाचा - Siddhanth Kapoor : ड्रग्ज घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सिद्धांत कपूरची जामिनावर सुटका..

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.