ETV Bharat / state

सीसीए आणि एनआरसी विरोधात जामनेर बंद; भारत मुक्ती मोर्चाने दिली बंदची हाक - जळगाव जिल्हा बातमी

एनआरसी तसेच सीएए कायद्याच्या निषेधार्थ देशभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. हा कायदा मागे घ्यावा, म्हणून विविध संघटना तसेच राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. एनआरसी तसेच सीएए कायद्याला विरोध करण्यासाठी सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून भारत मुक्ती मोर्चाने भारत बंदची हाक दिली आहे.

Jalgaon
जळगाव
author img

By

Published : Jan 29, 2020, 9:50 AM IST

जळगाव - केंद्र सरकारच्या वतीने प्रस्तावित असलेल्या एनआरसी तसेच सीएए कायद्याच्या निषेधार्थ आज जळगाव जिल्ह्यातील जामनेर बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये सर्व व्यापारी, व्यावसायिक प्रतिष्ठाने तसेच विविध सामाजिक, राजकीय संघटना सहभाग नोंदवणार आहेत. सकाळपासूनच या बंदचा परिणाम पाहायला मिळत आहे.

सीसीए आणि एनआरसी विरोधात जामनेर बंद

देशव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून भारत मुक्ती मोर्चाने भारत बंदची हाक दिली आहे. त्याला प्रतिसाद देत जामनेर शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडलेली नाहीत. या बंदमध्ये भारत मुक्ती मोर्चासह राष्ट्रीय मुस्लिम मंच, छत्रपती संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस तसेच आदिवासी एकता परिषदेने सहभाग नोंदवला आहे.

दरम्यान, या बंदमुळे जामनेर शहरासह तालुक्यातील दैनंदिन व्यवहार ठप्प होणार आहेत. बंद दरम्यान, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Intro:जळगाव
केंद्र सरकारच्या वतीने प्रस्तावित असलेल्या एनआरसी तसेच सीएए कायद्याच्या निषेधार्थ आज जळगाव जिल्ह्यातील जामनेर बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये सर्व व्यापारी, व्यावसायिक प्रतिष्ठाने तसेच विविध सामाजिक, राजकीय संघटना सहभाग नोंदवणार आहेत. सकाळपासूनच या बंदचा परिणाम पाहायला मिळत आहे.Body:एनआरसी तसेच सीएए कायद्याच्या निषेधार्थ देशभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. हा कायदा मागे घ्यावा म्हणून विविध संघटना तसेच राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. एनआरसी तसेच सीएए कायद्याला विरोध करण्यासाठी सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून भारत मुक्ती मोर्चाने भारत बंदची हाक दिली आहे. त्याला प्रतिसाद देत जामनेर शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडलेली नाहीत. या बंदमध्ये भारत मुक्ती मोर्चासह राष्ट्रीय मुस्लिम मंच, छत्रपती संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस तसेच आदिवासी एकता परिषदेने सहभाग नोंदवला आहे.Conclusion:दरम्यान, या बंदमुळे जामनेर शहरासह तालुक्यातील दैनंदिन व्यवहार ठप्प होणार आहेत. बंद दरम्यान, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.