सातारा - महाराष्ट्रीयन बेंदूर सोमवारी साजरा होत आहे. मात्र, राज्यात दुष्काळाचे सावट असल्याने यंदा सण कसा साजरा करायचा, अशी चिंता शेतकरी वर्गाला पडली आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाचा सण देखील चारा छावण्यावरती साजरा करावा लागणार आहे. दुष्काळामुळे उत्पादन नसल्याने तसेच सलग ४ ते ५ वर्षे पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्याला शेतीतून हवेतसे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे बेंदूर सण कसा साजरा करायचा, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. त्यामुळे तो परंपरेने बैल जोडी, गायी, म्हशी यांना दावी, कडे, म्होरक्या आणि रंग घेऊन जात आहे. मात्र, त्याचे प्रमाण मागील ३-४ वर्षापेक्षा कमी असून तो थोड्याच प्रमाणात या साहित्याची खरेदी करत असल्याची माहिती व्यापारी आणि दुकानदारांनी सांगितले.
परंपरा म्हणून सण साजरा करायचा
यंदा दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे परंपरा म्हणून पुरण पोळी फक्त निवद आणि जनावरांना घास म्हणून बनवली जाईल, असे शेतकऱ्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.