ETV Bharat / state

बारा बकऱ्यांच्या जत्रेसाठी चक्क ग्रामपंचायतीकडूनच वर्गणीचं आवाहन; अंनिसकडून कारवाईची मागणी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2023, 7:44 PM IST

Updated : Nov 16, 2023, 8:00 PM IST

Bara Bakaryanchi Jatra : साताऱ्यातील शेणोली (ता. कराड) येथील तीन वर्षांनी येणारी १२ बकऱ्यांची जत्रा सध्या वादात सापडली आहे. (Controversial Appeal of Shenoli Grampanchayat) या जत्रेत बोकडांचा बळी दिला जातो. (Appeal for Subscription for Fair) अशा जत्रेसाठी ग्रामपंचायतीनं नोटीस बोर्डवर चक्क प्रत्येकी १ हजार रुपये वर्गणी जमा करण्याचं आवाहन केलं आहे. या कारणास्तव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अंनिसने केली आहे.

Bara Bakaryanchi Jatra
अंनिसकडून कारवाईची मागणी
शेणोली ग्रामपंचायतीच्या वादग्रस्त आवाहनावर बोलताना अंनिसचे कार्यकर्ते

सातारा Bara Bakaryanchi Jatra : ग्रामीण भागातील यात्रा-जत्रांमध्ये अनेक प्रथा, परंपरा पाहायला मिळतात. त्यापैकी काही हटके तर काही वादग्रस्त असतात. साताऱ्यातील शेणोली (ता. कराड) या गावच्या यात्रेची आता अशाच वेगळ्या कारणानं चर्चा होत आहे. (Superstition Eradication Committee) तीन वर्षांनी येणारी अकलाईदेवीची १२ बकऱ्यांची जत्रा येत्या २८ नोव्हेंबरला येत आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीनं नोटीस बोर्डवर चक्क १ हजार रुपये वर्गणी जमा करण्याचं आवाहन केलं आहे. सध्या सगळीकडे शेणोली गावची जत्रा आणि बोकडांच्या वर्गणीचीच चर्चा आहे.

Bara Bakaryanchi Jatra
शेणोली ग्रामपंचायतीचे हेच ते वादग्रस्त आवाहन

गावची जत्रा अन् कारभारी सतरा : साताऱ्यातील तरुणांनी लॉकडाऊनच्या काळात 'गावची जत्रा कारभारी सतरा', नावाच्या वेबसिरिजची निर्मिती केली. सोशल मीडियावर ही वेबसिरीज तुफान लोकप्रिय झाली. सध्या अशाच एका जत्रेची सगळीकडे चर्चा ऐकायला मिळत आहे. शेणोली गावच्या अकलाईदेवीची २८ नोव्हेंबर रोजी जत्रा आहे. ही जत्रा तीन वर्षातून एकदा येते. १२ बकऱ्यांची जत्रा, असं या जत्रेला म्हटलं जातं. कारण या जत्रेत १२ बकऱ्यांचा बळी देण्याची प्रथा आहे. त्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेतला आहे.

ग्रामपंचायतीची झाली यात्रा कमिटी : शेणोली (ता. कराड) या गावच्या अकलाईदेवी जत्रेचं सध्या नियोजन सुरू आहे. परंतु, शेणोली गावात ग्रामपंचायतीची बॉडीच जत्रेच्या कमिटीचं काम करत आहे. जत्रेसाठी प्रत्येक बोकडामागे १ हजार रुपये वर्गणी द्यायची असल्याचं ग्रामपंचायतीच्या फलकावर लिहिलं आहे. त्यावरून हा फलक वादाचा विषय ठरला आहे.

ग्रामपंचायतीची भूमिका वादात : महात्मा फुले यांची कर्मभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं बालपणीचं शिक्षण, सत्यशोधक विचारांचा वारसा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना, क्रांतिसिंह नाना पाटील यांची प्रतिसरकारची चळवळ असा उत्तुंग वारसा कराड तालुक्याला लाभला आहे. तरीही येथील शेणोली गावात अशा प्रकारे बारा बकऱ्यांची जत्रा, तीही ग्रामपंचायतीनं फलक लिहून जाहीर करावी हा वादाचा विषय ठरत आहे. अर्थातच हे सगळे महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनी असावे, यामुळे ही जत्रा आणि ग्रामपंचायतीने केलेलं आवाहनसुद्धा वादग्रस्त ठरलं आहे.

अंनिसची कारवाईची मागणी : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर ज्या जिल्ह्यात होऊन गेले. जादूटोणा विरोधी कायदा तयार केला गेला‌ अशा सातारा जिल्ह्यात एका ग्रामपंचायतीच्या पुढाकारानं बोकडांचे बळी दिले जाणार आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून जत्रेतल्या बोकड बळीला प्रतिबंध घालण्याची मागणी अंनिसने केली आहे. यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अंनिसचे कार्यकारी समिती सदस्य प्रशांत पोतदार तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय मांडके यांच्याकडून करण्यात आली.

हेही वाचा:

  1. Nagapanchami Today : नागपंचमीला नाग देवतेला प्रसन्न करण्यासाठी दिला जातो कोंबड्याचा बळी, वाचा कुठे आहे ही प्रथा
  2. Bombay High Court: विशाळगड परिसरात जर बेकायदेशीर पशुबळी होत असेल तर ते खपवून घेणार नाही- न्यायालय
  3. Dog Killed : अंधश्रद्धेचा कळस! चक्क कुत्र्याला दगडावर आपटत दिला बळी

Last Updated : Nov 16, 2023, 8:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.