सातारा - राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर ( Bandatatya Karadkar arrest by Satara Police ) यांना सातारा पोलिसांनी अटक केली होती. तत्पुर्वी बंडातात्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली ( Bandatatya Karadkars apology ) होती. कराडकर यांची सुटका करण्यात आली आहे.
बंडातात्या कराडकर अटकेपूर्वी म्हणाले, की माझ्याकडून चूक झाली. त्यामुळे सर्व नेत्यांची आणि विशेषत: आमदार बाळासाहेब पाटील यांची आणि त्यांच्या मुलाची मी माफी मागताे, असे बंडातात्यांनी म्हटले आहे.
सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाविरोधात बंडातात्या कराडकरांनी गुरुवारी साताऱ्यात ( Agitation against Bandatatya in Maharashtra ) आंदाेलन केले. आंदोलनावेळी बोलताना 'काेणता पुढारी दारू पित नाही', असा सवाल करत त्यांनी महिला नेत्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केले ( Bandatatya controversial statement ) होते.
बंडातात्या कराडकर यांची पोलीस ठाण्यातून सुटका-
सातारा शहर पोलीस ठाण्यात चौकशी झाल्यानंतर बंडातात्या कराडकर यांची सुटका करण्यात आली. त्यांच्यावर भांदवि 188,269 500 आणि 509 नुसार शहर पोलिसांत आहे गुन्हा दाखल आहे. राजकीय महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्यावर सातारा शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सातारा शहर पोलिसानी तात्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तब्बल अडीच तास त्यांची चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांना तात्पुरत्या स्वरूपात जामिनावर सुटका करण्यात आली असल्याची माहिती त्यांचे वकील संग्राम मुंढेकर यांनी दिली आहे
कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मुलाबद्दलही त्यांनी वादग्रस्त आरोप केला होता. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात आंदोलने सुरू झाली आहेत.
संपूर्ण पवार कुटुंबीय हे निर्व्यसनी
ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले होते याबद्दल यांना कोल्हापुरात विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, बंडातात्या कराडकर यांच्याबद्दल आम्हाला अभिमान होता. ते समाजाला एक दिशा देणारे कीर्तनकार आहेत. मात्र, त्यांनी केलेल्या विधानामुळे मला दुःख झालेले आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आपल्या आयुष्यात कधीही मद्याच्या थेंबालासुद्धा हात लावलेला नाही. संपूर्ण पवार कुटुंबीय हे ( Hasan Mushrif on Pawar family ) निर्व्यसनी आहे.
हेही वाचा-Bandatatya Karadkar Controversial Statement : बंडातात्या कराडकर सातारा पोलिसांच्या ताब्यात