ETV Bharat / state

Matoshree Yojana : बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजनेतून ४६ वर्षांनी 'या' गावाला मिळाली ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत

कराड तालुक्यातील भवानवाडी ग्रामपंचायतीची स्थापना १९७५ साली झाली. मात्र, गेली ४६ वर्षे ग्रामपंचायतीला स्वतंत्र इमारत नव्हती. सेना-भाजप युती सरकारने सुरू केलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून भवानवाडी गावात आता ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत उभी राहिली आहे. आतापर्यंत या गावचा कारभार कसा चालायचा, याचा ईटीव्ही भारतने घेतलेला हा आढावा

Balasaheb Thackeray Smriti Matoshree Yojana
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजनेतून ४६ वर्षांनी 'या' गावाला मिळाली ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत
author img

By

Published : Mar 30, 2023, 7:35 PM IST

बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजनेतून ४६ वर्षांनी 'या' गावाला मिळाली ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत

सातारा : सातारा सर्वार्थाने पुढारलेला आणि पुरोगामी अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील कराडसारख्या सुजलाम्-सुफलाम् तालुक्यातील एका गावात तब्बल 46 वर्षांनी ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत उभी राहिली आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भवानवाडी, असे या गावाचे नाव. 1975 साली भवानवाडी ग्रामपंचायतीची स्थापना झाली होती. सेना-भाजप युती सरकारने सुरू केलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून भवानवाडी गावात आता ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत उभी राहिली आहे. आतापर्यंत या गावचा कारभार कसा चालायचा, याचा ईटीव्ही भारतने घेतलेला हा आढावा.

ग्रामपंचायतीची 1975 ला स्थापना : भवानवाडी ग्रामपंचायतीची स्थापना १९७५ साली झाली. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेले भवानवाडी हे दीड हजार लोकसंख्येचे गाव. लोकसंख्येने छोट्या असलेल्या या गावाला स्थापनेपासून ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत नव्हती. भवानीमाता मंदिरालतच्या छोट्या खोलीतून गेली 46 वर्षे गावचा कारभार चालत होता.

छोट्या खोलीत ग्रामपंचायत कार्यालय : भवानवाडी गावचे दैवत असलेल्या भवानीमाता मंदिराशेजारी दहा बाय पंधराच्या छोट्याशा खोलीतूनच आजअखेर ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार सुरू होता. 1975 पासून ग्रामपंचायतीला स्वतंत्र इमारत नसल्याची बाब ग्रामस्थांना खटकत होती. परंतु, राजकीय पातळीवर त्याची कोणीच दखल घेतली नाही, अशी खंत माजी उपसरपंच शिवाजी भोसले यांनी व्यक्त केली.

बाळासाहेब ठाकरे योजना ठरली फायदेशीर : राज्यात २०१४ साली सत्तेवर आलेल्या सेना-भाजय युती सरकारने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ग्रामपंचायत बांधणी योजना जाहीर केली. २०१८ मध्ये भाजपचे तत्कालीन कराड उत्तर तालुकाध्यक्ष अ‍ॅड. महादेव साळुंखे यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत इमारतीचा प्रस्ताव तत्कालिन पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातून शासनाला सादर केला. त्यानंतर दोन वर्षात ग्रामपंचायतीची टुमदार इमारत उभी राहिली असल्याची माहिती माजी सरपंच स्वाती पवार यांनी दिली.

सार्वजनिक कामे लोकवर्गणीतून : भवानवाडी ग्रामस्थ गावातील सार्वजनिक कामे लोकवर्गणीतून करतात, हेदेखील या गावाचे वैशिष्ट्य आहे. लोकवर्गणीतून बांधलेले भवानीमाता मंदिर हे त्याचे उदाहरण आहे. स्थापत्य कलेचा उत्तम नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते. या मंदिरामुळे गावच्या सौंदर्यात भर पडली आहे. बारमाही पाण्याची सोय असल्यामुळे कराड उत्तरमधील बागायती गाव म्हणून भवानवाडीचा लौकीक आहे. भवानवाडी-मसूर फाटा या रस्त्याच्या कामालाही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे भवानवाडी गाव महामार्गाशी जोडले जाणार आहे.

हेही वाचा : Uddhav Thackeray On CM : धनुष्यबाण चोरला, तरी ब्रह्मास्त्र माझ्यासोबत; उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला सुनावले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.