ETV Bharat / state

सातार्‍यातील कोविड प्रतिबंधासाठी पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे 91 कोटी 84 लाखांच्या निधीची मागणी

सातारा जिल्ह्यातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती पाहता आणखी वैद्यकीय सुविधांची उभारणी करणे गरजे आहे. त्यासाठी सातारा जिल्ह्याला 91 कोटी 84 लाखांचा निधी द्यावा, अशी मागणी सातार्‍याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

balasaheb patil
बाळासाहेब पाटील
author img

By

Published : Sep 9, 2020, 10:41 PM IST

कराड (सातारा)- कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती पाहता आणखी वैद्यकीय सुविधांची गरज आहे. त्यासाठी सातारा जिल्ह्याला 91 कोटी 84 लाखांचा निधी द्यावा, अशी मागणी सहकार, पणन मंत्री तथा सातार्‍याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा-कंगना वादावर संजय राऊतांचे आता 'नो कॉमेंट'

सातार्‍यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय येथे जंबो कोविड हॉस्पिटल सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. तथापि, सद्यस्थितीत निधी अभावी जंबो हॉस्पिटल उभारणीस विलंब होऊ शकतो. याठिकाणी ऑक्सिजन बेडसह 250 खाटांच्या हॉस्पिटलसाठी, तसेच अनुषंगिक साधनसामुग्री, मनुष्यबळसाठी निधीची गरज आहे. काशिळ (ता. सातारा) येथे ट्रामा केअर सेंटरसह 50 आयसीयु बेडसह नवीन हॉस्पिटल उभारण्यासाठीची मोठ्या निधीची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांना कळवलेल्या प्रस्तावात पालकमंत्र्यांनी कळवले आहे.

बाधितांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे, देखभाल, दुरुस्ती, प्रयोगशाळा चाचणी, व्हेंटिलेटर, हवा शुद्धीकरण यंत्र यासह अन्य साधनसामग्रीच्या खर्चासाठी एकूण 91 कोटी 84 लाखांचा निधी मिळावा, अशी मागणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याशिवाय सातारा जिल्हा रुग्णालयातील रिक्त असलेल्या फिजिशियन पदासह अन्य रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.