ETV Bharat / state

मराठी नवकवितेचे जनक बा. सी. मर्ढेकरांच्या नशिबी उपेक्षाच! - b c mardhekar poet

दोन वर्षांत 36 लाख रुपये खर्चून इमारतीचे काम पुर्णत्वास गेले. तरिही वास्तूचे लोकार्पण झाले नाही. आज 10 वर्षे लोटली आहेत तरी ग‍ाव‍ामध्ये ग्रंथालय सुरू झाले नाही. साहित्य संमेलनांतील बडेजावावर दरवर्षी कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी होते. परंतू, बा. सी. मर्ढेकरांसारख्या साहित्य सरस्वतीच्या खऱ्या मानकऱ्यांचा मृत्यूनंतरही उपेक्षाच वाट्याला येतात. हे चित्र बदलणार की नाही, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

b-c-mardhekars-memorial
बा. सी. मर्ढेकर स्मारक
author img

By

Published : Jan 8, 2020, 8:35 PM IST

Updated : Jan 10, 2020, 10:14 AM IST

सातारा - "आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या ssss सरी!" असे निसर्गकाव्य खुलवणारे बा. सी. मर्ढेकर यांचे स्मारक 10 वर्षांहून अधिक काळ झाले तरी धूळखात पडून आहे. कृष्णाकाठावर बसून अपरिमित काव्याची देणगी मराठी साहित्य विश्वाला देणाऱया थोर कवीच्या स्मारक उभारणीकडे दुर्लक्ष करून सरकारने एकप्रकारे या कविला दुर्क्षाच्या खाईत लोटले आहे. सुमारे 36 लाख खर्चूनही पुर्णत्वाला न गेलेले स्मारक कधी उभारणार, असा सवाल मर्ढे येथील ग्रामस्थ आता करत आहेत.

मराठी नवकवितेचे जनक बा. सी. मर्ढेकरांच्या नशिबी उपेक्षाच!

जाळीजळमटांनी व्यापलेली वास्तू -

साताऱ्याजवळ सुमारे 19 किमी अंतरावर महामार्गालगत 10 ते 15 मिनिटांच्या अंतर‍ावर मर्ढे आहे. गावात प्रवेश करताच एका चौकात समोर सोसायटीची इमारत आहे. तीच्या शेजारीच बाळकृष्ण सीताराम तथा बा. सी. मर्ढेकर यांच्या नियोजित स्मारक‍ाची नुतन वास्तू दृष्टीस पडते. वास्तुमध्ये चार खोल्या, एक दिवाणखान आणि शौचालय पाहायला मिळते. कविवर्य मर्ढेकर यांच्या नियोजित पुतळ्याचा चौथराही पाहायला मिळतो. धुळीने माखलेली व जाळी-जळमटांनी व्यापलेल्या या इमारतीमधील चार भिंती व छताशिवाय काहीही नाही. जवळच, कृष्णा तीरावर मर्ढेकर यांचे जुने राहते घर आहे, पण त्याचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही.

3 वेळा झाले भूमीपूजन -

स्थानिक कार्यकर्ते, काव्यप्रेमी अजित जाधव यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की "साताऱ्यात 1993 ला अभिजात मराठी साहित्य संमेलन भरले होते. दिवंगत अभयसिंहराजे भोसले हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. या संमेलनाची सुरुवात मर्ढे येथून झाली होती. यावेळी ज्येष्ठ समिक्षक शंकर सारडा यांच्या हस्ते बा. सी. मर्ढेकर स्मारकाचे प्रथम भूमीपूजन झाले. त्यानंतर 2000 व 2007 अशा दोन वर्षामध्ये दोन वेळा या स्मारकाचे भूमीपूजन झाली. 2009 मध्ये सध्याची वास्तू उभी राहिली. त्यानंतर काही गोष्टी ठरल्या त्यानुसार भिंतींवर मर्ढेकरांच्या कविता लिहावयाच्या, वर्षातून 2 संमेलने भरवायची, (त्यातील एक स्थानिक स्तरावरील असेल) आनेवाडी फाट्यावर स्मृतीस्तंभ उभा करायचे असे ठरले होते. सातारा जिल्ह्यातील भिलारपुर्वी मर्ढे गावाला कवितांचे गाव करावे, अशी आमची मागणी होती. यातील काहीच झाले नाही. शासनाने स्मारकाची उपेक्षा केली."

21 लाखांचे झाले काय?

शासनाकडून मंजूर असलेल्या 48 पैकी 36 लाख रुपये इमारतीवर खर्च झाले. उर्वरीत 12 लाखांच्या निधीचे काय झाले? असा ग्रामस्थांना प्रश्न आहे. 'खिडक्यांना क‍ाचा नसून मर्ढेकर यांचा पुतळा उभा राहिला. फर्निचर नाही की वाचनालय नाही. स्थानिक स्तरावर अनेकदा पाठपुरावा केला. तसेच तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांनी बैठक घेतली. मात्र, आतापर्यंत हे दुर्लक्षीतच राहीले' असा आरोप मर्ढे गावचे सरपंच शरद संपत शिंगटे यांनी केला आहे.

मृत्यूनंतरही उपेक्षाच -

दोन वर्षांत 36 लाख रुपये खर्चून इमारतीचे काम पुर्णत्वास गेले. तरिही वास्तूचे लोकार्पण झाले नाही. आज 10 वर्षे लोटली आहेत तरी ग‍ाव‍ामध्ये ग्रंथालय सुरू झाले नाही. साहित्य संमेलनांतील बडेजावावर दरवर्षी कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी होते. परंतू, बा. सी. मर्ढेकरांसारख्या साहित्य सरस्वतीच्या खऱ्या मानकऱ्यांचा मृत्यूनंतरही उपेक्षाच वाट्याला येतात. हे चित्र बदलणार की नाही, हा खरा प्रश्न आहे.

Intro:सातारा : आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या ... ssss सरी ! असं निसर्गकाव्य खुलवणारे बा.सी. मर्ढेकर यांचे स्मारक 10 वर्षांहून अधिक काळ धूळखात पडून आहे. कृष्णाकाठावर बसून अपरिमित काव्याची देणगी मराठी साहित्य विश्वाला देणा-या थोर कवीच्या स्मारक उभारणीकडे दुर्लक्ष करून शासनाने एकप्रकारे या कविला दुर्क्षाच्या खाईत लोटले आहे. Body:सुमारे ३६ लाख खर्चूनही पुर्णत्वाला न गेलेले स्मारक कधी उभारणार, असा सवाल दिन दशकाहून अधिक काळ यासाठी पाठपुरावा करणा-या मर्ढे ग्रामस्थांचा आहे.

जाळीजळमटांनी व्यापलेली वास्तू

साता-याजवळ, सुमारे 19 किलोमिटर अंतरावर महामार्गालगत 10 ते 15 मिनिटांच्या अंतर‍ावर मर्ढे लागतं. गावात प्रवेश करताच एका चौकात समोर सोसायटीची इमारत आहे. तिच्या शेजारीच बाळकृष्ण सीताराम तथा बा. सी. मर्ढेकर यांच्या नियोजित स्मारक‍ाची नुतन वास्तू दृष्टीस पडते. खाली-वर 4 रुमस्, टाॅयलेट, एक हाॅल व कविवर्य मर्ढेकर यांच्या नियोजित पुतळ्याचा चौथरा आहे. धुळीने माखलेली व जाळी-जळमटांनी व्यापलेल्या या इमारतीत चार भिंती व छताशिवाय काहीही नाही. जवळच, कृष्णातिरावर मर्ढेकर यांचे जुने राहते घर आहे, पण त्याचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही.

3 वेळा झाले भूमीपुजन

स्थानिक कार्यकर्ते, काव्यप्रेमी अजित जाधव यांनी 'ई टिव्ही'शी बोलताना सांगितले की "साता-यात 1993 साली अभिजात मराठी साहित्य संमेलन भरले होते. (स्व.) अभयसिंहराजे भोसले स्वागताध्यक्ष होते. या संमेलनाची सुरुवात मर्ढ्यातून झाली. ज्येष्ठ समिक्षक
शंकर सारडा यांच्या हस्ते बा. सी. मर्ढेकर स्मारकाचे प्रथम भुमिपुजन झाले. त्यानंतर 2000 व 2007 असे दोन वेळा भुमिपुजन झाली. 2009 मध्ये सध्याची वास्तू उभी राहिली. भिंतींवर मर्ढेकरांच्या कविता लिहाव्यात. वर्षातून 2 संमेलने भरवायची; एक स्थानिक स्तरावरील असेल. आनेवाडी फाट्यावर स्मृतीस्तंभ उभा करायचा, असे ठरले होते. सातारा जिल्ह्यातील भिलारपुर्वी मर्ढे गावाला कवितांचे गाव करावे, अशी आमची मागणी होती. यातील काहीच झाले नाही. शासनाने स्मारकाची उपेक्षा केली."

21 लाखांचे झाले काय?

शासनाकडून मंजूर असलेल्या 48 पैकी 36 लाख रुपये इमारतीवर खर्च झाले. उर्वीत 12 लाखांच्या निधीचे काय झाले? असा ग्रामस्थांना प्रश्न आहे. 'खिडक्यांना क‍ाचा नाहीत. बा.सी. मर्ढेकर यांचा पुतळा उभारला राहिला. फर्निचर नाही कि वाचनालय नाही. स्थानिक स्तरावर अनेकदा पाठपुरावा केला. तत्कालीन प्रांताधिका-यांनी बैठक घेतली. लक्ष घालतो म्हणाले; पण आत्तापर्यंत दुर्लक्षच झाले' असा आरोप मर्ढे गावचे सरपंच शरद संपत शिंगटे यांनी केला.

मृत्यूनंतरही उपेक्षाच
दोन वर्षांत 36 लाख रुपये खर्चून इमारतीचे काम पुर्णत्वास गेले. त्याचे लोकार्पण झाले नाही. आज 10 वर्षे लोटली साधे ग्रंथालय ग‍ाव‍ात सुरु झाले नाही. साहित्य संमेलनांतील बडेजावावर दरवर्षी कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी होते, परंतू बा. सी. मर्ढेकरांसारख्या साहित्य सरस्वतीच्या ख-या मानक-यांना मृत्यूनंतरही उपेक्षाच वाट्याला येतात. हे चित्र बदलणार की नाही, हा खरा प्रश्न आहे.

-------------------------
टिप :अजुन vdo वेगळया फाइलने देतआहेConclusion:
Last Updated : Jan 10, 2020, 10:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.