ETV Bharat / state

#Covid19: अंगणवाडी सेविकांसाठी डॉ.अतुल भोसले युवा प्रतिष्ठानने दिले १ हजार मास्क

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविकांच्या सुरक्षेसाठी कराडमधील कृष्णा उद्योग समूह आणि डॉ.अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्यावतीने 1 हजार मास्क पुरविण्यात आले आहेत.पंचायत समितीच्या वतीने मास्कचे अंगणवाडी सेविकांना वितरण केले जाईल

author img

By

Published : Apr 1, 2020, 8:56 AM IST

atul-bhosale-youth-foundation-gave-one-thousand-mask-to-anganwadi-sevaika
#Covid19: अंगणवाडी सेविकांसाठी डॉ.अतुल भोसले युवा प्रतिष्ठानने दिले १ हजार मास्क

कराड (सातारा) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविकांच्या सुरक्षेसाठी कराडमधील कृष्णा उद्योग समूह आणि डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्यावतीने 1 हजार मास्क पुरविण्यात आले आहेत. कराड पंचायत समितीचे महिला व बालविकास प्रकल्पाधिकारी विशाल कोतागडे यांच्याकडे हे मास्क सुपूर्द करण्यात आले असून गावोगावच्या अंगणवाडी सेविकांना मास्कचे वितरण केले जाणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच जनजागृतीसाठी गावपातळीवर अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा कर्मचारी कार्यरत आहेत. घरोघरी जाऊन त्या सर्व्हेक्षण करत आहेत. परदेशातून अथवा दिल्ली, मुंबई, पुणे या भागातून गावी आलेल्या लोकांच्या नोंदी घेत आहेत. त्यांच्यामध्ये काही लक्षणे दिसत आहेत का?, याची माहिती त्या दररोज घेत आहेत.

जोखमीचे काम करणार्‍या अंगणवाडी सेविकांना शासनाकडून पुरेशा प्रमाणात मास्क मिळू शकलेले नाहीत.ही परिस्थिती लक्षात घेऊन कृष्णा उद्योग समूह व डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानने अंगणवाडी सेविकांसाठी 1 हजार मास्क उपलब्ध करून दिले आहेत. गावोगावी कार्यरत असणार्‍या अंगणवाडी सेविकांना या मास्कचे वाटप केले जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.