ETV Bharat / bharat

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू आजपासून भारत दौऱ्यावर; 'ताजमहाल'लाही देणार भेट - Maldives President India Visit

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू हे आजपासून (6 ऑक्टोबर) भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात मुइज्जू ताजमहाललादेखील भेट देणार आहे.

maldives president muizzu to be in india from october 6 to 10, second visit in 4 months
मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू ताजमहालला भेट देणार (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2024, 10:51 AM IST

आग्रा : मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू हे आजपासून (6 ऑक्टोबर) ते 10 ऑक्टोबरपर्यंत आपल्या कुटुंबासह भारत दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, 8 ऑक्टोबर रोजी ते ताजमहाल पाहण्यासाठी आग्रा येथे जाणार आहेत. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना दोन तास प्रवेश बंद राहणार आहे. या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयानं भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय), पोलीस आणि प्रशासनाला पत्र पाठवलंय. या पार्श्वभूमीवर एएसआयनं ताजमहालच्या पूर्व आणि पश्चिम दरवाजासह सर्व बुकिंग काउंटर मंगळवारी सकाळी 8 ते 10 या वेळेत बंद ठेवण्याचे आदेश जारी केलेत.

पाच दिवसांचा भारत दौरा : मुइज्जू हे पाच दिवस भारत दौऱ्यावर असून मंगळवारी सकाळी 9 वाजता ते नवी दिल्लीहून विशेष विमानानं आग्राच्या खेरिया विमानतळावर उतरतील. तेथून व्हीव्हीआयपी कारनं ताजमहाल पाहण्यासाठी ईस्ट गेटवर पोहोचतील. ते तासभर ताजमहालला भेट देणार आहेत. 10 वाजेच्या सुमारास ते तेथून बाहेर पडतील. त्यामुळं सकाळी 8 ते 10 या वेळेत ताजमहाल सर्वसामान्य पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.

11 वर्षात मालदीवचे तिसरे राष्ट्रपती आग्राला भेट देणार: मालदीवचे राष्ट्रपती ताजमहाल पाहण्यासाठी आग्रा येथे येत असल्याची ही पहिली वेळ नाही. मालदीवच्या राष्ट्रपतींची गेल्या 11 वर्षांत ताजमहालला भेट देण्याची ही तिसरी वेळ आहे. मालदीवचे राष्ट्रपती आवर्जून ताजमहाल पाहायला येतात. 4 जानेवारी 2013 रोजी मालदीवचे तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन अब्दुल गयूम ताज आग्रा येथे आले. त्यांनी ताजमहालला भेट दिली. पाच वर्षांनंतर, डिसेंबर 2018 मध्ये, मालदीवचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सलेह यांनी त्यांची पत्नी फजना अहमदसोबत ताजमहालला भेट दिली.

तिकीट खिडकी आणि ऑनलाइन बुकिंग राहणार बंद : एएसआय अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. राजकुमार पटेल म्हणाले की, "मालदीवचे राष्ट्रपती 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता ताजमहालला भेट देण्यासाठी येणार आहेत. त्यामुळं ताजमहालच्या पूर्व आणि पश्चिम दरवाजातून सकाळी 8 वाजता सामान्य पर्यटकांना प्रवेश बंद केला जाईल. दोन्ही प्रवेशद्वारांचे बुकिंग काउंटरही बंद राहणार आहेत. यासोबतच सकाळी एएसआयच्या वेबसाइटवरून तिकीट बुकिंग होणार नाही. जे पर्यटक मंगळवारी सूर्योदयावेळी आत प्रवेश करतील, त्यांना 8 वाजण्यापूर्वी ताजमहालच्या बाहेर काढलं जाईल."

हेही वाचा -

  1. मालदीवच्या संसदेत तुफान राडा, खासदारांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी हाणलं! पाहा व्हिडिओ
  2. मालदीवच्या राष्ट्रपतींचा सूर बदलला, भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत म्हणाले...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.